हो..तुला हे ऐकावेच लागेल ....
झालीस न शेवटी तयार ...
तर मग ऐक ...
तू तिकडे कर्तव्यपूर्ती करत बसलीस ...
पण माझी अजिबात आठवण येत नाही ...
मी एवढे मेसेज आणि फोन करूनही तुला ..
तुला मला त्याचा रिप्लाय द्यावासा वाटत नाही .....
तुझा स्वभाव ...
तुझ्या महत्वाकांक्षा ...
पण माझं काय ??
माझा विचार केलायस..?
तुझ्या इतका व्येवाहारिक नाही वागू शकत मी ...!!
जेव्हा त्यागाची किंमत शून्य ठरते ना ,
तेव्हा सोसण्यालाही अर्थ उरत नाही ....
दिवसागणिक माझं मन आतून पोकळ होत चाललंय ...
तुझं प्रेमही माझ्या आयुष्याशी समांतर होत चाललंय ..
पण माझ्यापर्यंत पोहचणार कधी ..??
अर्थात तुझ्यासमोर मी इतका लाचार तरी का होऊ...... ??
मी बदलतोय .... शांत शांत आहे ... गप्प झालोय ...!
हे कळत नाही का तुला... ??
सनी ..एक वेडा मुलगा .....!