Wednesday, March 30, 2011

का जन्माला आलो मी मध्यमवर्गीय कुटुंबात ...?

का जन्माला आलो मी ..
एका मध्यम वर्गीय कुटुंबात ...?
हौस नाही मौज नाही .
वाढदिवसाला साधी चोकलेट नाही ..?

नवीन ड्रेस घेतला कि त्या दिवशी दिवाळी
बाकी दिवस म्हणजे आयुष्याची होळी ..
शाळेच्या सुट्टीचा आनंद नसायचा
दुसरे दिवशी रोजगार हमीचा रस्ता दिसायचा ..!

शाळा सुरु झाली कि मित्र एकत्र बसायचे ..
सुट्टीतल्या गमती सांगत असायचे ..
मी काय सांगणार ..रोजगार हमी ..?
डोळ्यात पाणी आणून ऐकत बसायचो ...
ऐकता ऐकता नुसतंच हसायचो ..
मग मित्रही मला समजून घ्यायचे ..
तो विषय मग तिथेच बंद व्हायचा ...
आणि पुन्हा नवीन दिवस चालू व्हायचा ...!

मनात आले का हेच आपले आयुष्य ..
तेव्हाच निर्णय घेतला आपण आता
आता आपण खूप शिकायचे ..
मिडल क्लास मधून हायर क्लास मध्ये जायचे ..
म्हटले अगोदर पाहून घ्यावे ..
हायर क्लास काय असतो जाणून घ्यावे ...

गेलो मग मित्राच्या घरी ...
दार उघडायला नोकर आला ..
कामवाले बाई ने पाणी दिले
कुक ने जेवण दिले ..
आई मात्र झोपली होती ..
म्हणे पार्टीहून रात्री लेट आली होती ..

ह्याची रूम वेगळी होती
रूम मध्ये सिगारेट होती ..
एका ड्रावर मध्ये बिअर होती ..
पत्याचा कॅट होता ..
आईची मध्ये चक्कर झाली ..
ग्लास मधली बिअर पाहून गेली ..

मनात प्रश्न आला हीच का संस्कृती ..
हेच का हायर क्लास ..?
असेच असेल तर मला नको आहे ..
माझा मिडल क्लास किती ग्रेट आहे ..
माणसे माणसांचा मान ठेवतात ..
मुलं पण आई बापावर प्रेम करतात ..
इकेडे कुणीच कुणाचे नसतात
म्हणूनच ते लोक वरून हसले
तरी आतून रडत असतात ... आतून रडत असतात ..!!

सनी ..एक वेडा मुलगा ..!!

Friday, March 25, 2011

अरे ..मी फक्त तुझीच आहे...!!


फार काही नको मला तुझेकडून
फक्त एकदाच....
जवळ येवून विश्वासाने....
माझा हात हातात घे ...
आणि बोल अरे ..मी फक्त तुझीच आहे ...!!
...
जेव्हा एखाद्या संध्याकाळी
मनात माझ्या काहूर माजेल ..
सगळ जग सुनं सुनं वाटेल ..
मनात कदाचित आत्महत्येचा ....
विचार हि डोकावून जायील ...
तेव्हा ..
जवळ येवून विश्वासाने..
माझा हात हातात घे ...
आणि बोल अरे ..मी फक्त तुझीच आहे ...!!

मलाही गरज असेल ..तुझी
सगळी दुनिया विरोधात असल्यावर ..
जगण्याची लढाई लढताना थकल्यावर ..
जगण्याची इछाच मरून गेल्यावर
मरणाच्या अगोदर फक्त एक क्षण ...
जवळ येवून विश्वासाने..
माझा हात हातात घे ...
आणि बोल अरे ..मी फक्त तुझीच आहे...!!

माझे विचारही बदलतील कदाचित तुझ्या येण्याने
मीही पुन्हा नव्याने उभा राहील तुझ्या साथ देण्याने
सुरु करील जीवन नव्या जोशात आणि ताकतीने ..
सामोरा जाईल नवीन लढाई जिंकायला ...
फक्त तुझ्याच साथीने ...!!

म्हणून फक्त त्यासाठीच .....
एकदा जवळ येवून..
विश्वासाने..माझा हात हातात घे ...
आणि बोल अरे ..मी फक्त तुझीच आहे...!!

सनी ..एक वेडा मुलगा 

Thursday, March 24, 2011

मला सोडून जाताना.........!!


मला सोडून जाताना..
 तू थोडं तरी थांबायला हवं होतं ..
माझं काय चुकलं हे सांगायला हवं होतं ..
कदाचित असेलही मी रागावलो तुझ्यावर ..
पण तू  ..
मला एकदा तरी समजवायला हवं होतं ...

पण नाही ...
तू  आणि तुझा  इगो ...
तुझे  फ्रेंडस  ..
तुझं स्टेटस ..तुझं करिअर..
तू स्वतःच्याच विश्वात रममाण होती..
माझ्या भावनांची कदर तुला थोडीच होती ..?
माझ्याबरोबर घालवले अनमोल क्षण ..
क्षणार्धात विसरून निघाली होती ...!

आठवतंय का तुला ..
मन माझं भरून येत होतं ....
तुझ्या गोड आवाजात एक शब्द बोललीस तरी ..
पूर्ण दिवस आनंदात जायचा माझा
तू स्मित जरी हसलीस तरी ...

डोळे माझे सुखावत होते ..
तू  पाठमोरी  दिसलीस तरी ..
आता तू फक्त  कल्पना कर ..
काय अवस्था होत असेल माझी ..
तू  थोडी जरी नाही दिसलीस तरी ...!

मान्य आहे मला मीही चुकत असेल ..
पण तुझी गलती काहीच नसेल .. ?
तुझ्या चुका बद्दल मी कधीच बोललो नाही
याचा अर्थ असा नाही की मला त्रास झालाच नाही ..
खूप काही सहन केलं ग मी ....!!

म्हणूनच मनापासून वाटतं ...
जाताना तू थोडं तरी थांबायला हवं होतं ..
माझं काय चुकलं हे सांगायला हवं होतं ..
कदाचित असेलही मी तुझ्यावर  रागावलो ..
पण तू माझ्यावर रागावून जाताना ...
मला एकदा तरी समजवायला हवं होतं .......!!

सनी ..एक वेडा मुलगा .

Tuesday, March 15, 2011

काय किंमत आहे ...........!!!


श्वास होता श्वासात तेव्हा
नव्हतं कोणी डोकावून बघायला
आज जेव्हा श्वासाच उरला नाही
तेव्हा आले सगळे बघायला .....!

नव्हतं कुणी रडायला माझेबरोबर ..
तेव्हा नव्हतं कुणी हसायला ..
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन ..
तर , आले सगळे टाहो फोडायला ....!

आज पहा माझा काय  थाट.!
लोक जमतील मला अंघोळ घालायला
आयुष्यभर कधी नाही  पाहिलं कापड
आज नवीन पांढरे शुभ्र वस्र मला नेसायला ...!

जेव्हा उपाशी होतो रात्रो रात्र ..
नव्हतं कोणी एक घास खाऊ घालायला ..
आज जेव्हा भूक मेली माझ्याच बरोबर माझी ..
ठेवलाय माझेसाठी त्यांनी भात शिजायला .....

जन्मभर लाथ मारून गेले ते मला
आज आले माझ्या पाया पडायला
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी ..
आज चौघे चौघे  आले मला धरायला ..!

आज काय किंमत त्या रडण्याला ..?
आज काय किंमत त्या छाताड झोडण्याला..?
ज्या घरात राहातच नाही आज कोणी ..
काय किंमत आहे "ती " घरपुजा करण्याला ..?
काय किंमत आहे "ती " घरपुजा करण्याला ..?



sangrahit By My Friend : Saajan Uchade

Friday, March 11, 2011

आपण भेटलो तर.........!!


आपल्याला माहीत होतच
पहिल्यापासून की शक्यतो
आपलं लग्न होणं
अवघड आहे ...
कदाचित होणार हि नाही ....

पण तरी आपण
जगाची नजर चूकवून
भेटतच राहीलो...
जणू की आपल्य़ाला
हेही माहीत होतं की शक्यतो
लग्न वेगळं अन हे वेगळं ...

मिळालेल्या संधीचे नि क्षणांचे
आपण धनी झालो
पण जाता जाता..
एकमेकांच्या मनावर..
घाव करत  गेलो ...

आपल्याला माहीत असल्यासारखे
की अशा...
जखमा केल्याशिवाय
एकमेकांपासून पुरतं दूर होणं
शक्यच नव्हतं म्हणून...

आज याच शहरात
वावरतो आहोत
आपण दोघेही ...
वेगवेगळे ....

दोघांच्याही मनात
रोजरोज तिच आंदोलन...
एकमेकांविषयीची...

पण आता दोघांच्याही
मनाचे मालक
वेगवेगळे......

योगयोगानं रस्त्यात
दिसतोही आपण
एकमेकांना..
पण दोघेही
टाळून जातो
एकमेकांची नजर...
मनाची वळणे ...

दोघांनाही पक्क
ठाऊक असल्यागत की
आपण भेटलो तर.........!!










sangrahit.....

Tuesday, March 8, 2011

तू माझ्यापासून पासून दूर जाताना ...........!!


तू माझ्यापासून पासून दूर जाताना ..
मन कुठे तरी सांगत होतं..
" थांबव तिला ......." तिची खूप गरज आहे मला ..
पण अंतर मात्र आपल्यातलं
खूप दूरवर लांबत होतं ...

तुझ्या नजरेला नजर भिडताना
हि नजर काहीतरी मागत होती
" तू असावीस सोबतीला "
बस हीच एक आस होती ...

तू दूर दूर जात होतीस
पण मन मात्र तुझ्यात गुंतत होतं
दूरवर असूनही तुझं ते असणं
मनाला स्पर्श करत होतं ..

तुझ्या शेवटच्या नजरेत
मला जे भाव जाणवले
"दुराव्याच्या नैराश्याचे"होते का ते ?
असे प्रश्नचिन्ह मनात डोकावले ...

उलगड हे कोडे माझ्या मनाचे ..
साद घालतो तुला ...
अपूर्णच राहील मी आता
जर तू नाही वंचिले मला ....................!!








सनी ..एक वेडा मुलगा 

Sunday, March 6, 2011

जेव्हा तू मला भेटली होतीस ....!


पहिले जेव्हा तू मला भेटली होतीस
पुढे असं काही होईल हे कधीच वाटले नाही ..
तू मला भेटण्या आधी खर तर
प्रेम मला कधीच कळलं नाही .....!

आयुष्याचा एक एक दिवस पुढे ढकलताना
जीवनात अशी बहार येईल असा कधी वाटलंच नाही..
खरं तर तू भेटल्यानंतर मला जाणवलं..
आज पर्यंत मी जे जगलो त्याला जगणं म्हणतच नाही .....!

प्रत्येक क्षणाला  तुझ्या प्रत्येक गोष्टीत .
मी गुंतेन असा मला कधी वाटलंच नाही
तुझ्या त्या तिरकस नजरेत हरवून
कसा तुझ्यात ओढत होतो हे मला कळलंच नाही .....!

तुझा हवाहवासा सहवास , तुझा तो स्पर्श
येवढं वेड लावेल असं कधी वाटलंच नाही
मुसळधार पावसातही कोरडा राहणारा मी
हलक्या सरीतही का भिजतोय ? हे कधी कळलंच नाही ...

चातकासारखी तुझी वाट पाहताना
कोणासाठी एवढा झुरेन असं कधी वाटलंच नाही
आपल्या तो दुराव्याचा एक एक क्षण
मरणापेक्षाही कठोर असेल हे मनाला पटलंच नाही ...!

माझ्या आयष्यात कुणी असा हळुवार येवून
माझा श्वासच बनून जाईल,कधी वाटलंच नाही
माझ्या  आयुष्यातील वाळवंटाची ही बाग होताना ..
अचानक.. मला जाग येईल असंही कधी वाटलंच नाही......!!


सनी ..एक वेडा मुलगा ...!!

Friday, March 4, 2011

आयुष्य.............!!


मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं...?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन जातो ,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं....?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळलेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं...?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं...?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,...
शहरातल्या डाबंरी रस्तावर..
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर....?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित......?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा
दुसर्‍याला आनंद देण्याचा.. ..............!!








Sangrahit ......!!