Monday, June 20, 2011

विसरायला हवे....!


आपण एक निर्णय घेऊ यात आज

दु:ख होईल पण नाही विलाज ..

आज आपणच तोडायला हवेत ..

आता सारी नाती सारे बंध ..

दूर करायला हवा हळव्या प्रीतीचा गंध ...!!

विसरायला हवे आता जुनी स्मृती

जुने नाते ..जुणे ऋणानुबंध ..!

अलगद सोडून टाकू हे

प्रेमाचे हे रेशमी धागे

वळून पाहिलाही आता काही ..

ठेवायचे नाही मागे ..!

आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे ..

भरलेले रंग आपणच पुसायचे .

घेतलेल्या आणाभाका ..

शेवटपर्यंत साथ देण्याचे स्वप्नं ..

गंगेच्या वाहत्या धारेत सोडायचे ..

अन पापण्यात अश्रू दडवून ..

फक्त जगासमोर हसायचे ...!

आपणच पाहिलेल्या स्वप्नांना ..

आपणच देऊ मुठ माती ...

या जन्मीचं राहिलेले प्रेम ..

राखून ठेऊ पुढच्या जन्मासाठी .....!


सनी ..एक वेडा मुलगा ....!

नसेन मी.....!


उद्या काय असेन मी ..नसेन मी

तरीही तुमच्यात मागे उरेन मी ..

कुणाच्या आठवणीत ..कुणाच्या शिव्यांत,

कुणाचा चांगला मित्र ..कुणाचा मानलेला दुश्मन

कुणाच्या हसण्यात ...

तर कधी कुणाच्या हसता हसता पाणावलेल्या डोळ्यांत..

अश्रू बनून मागे उरेन मी ..

उद्या काय असेन मी ..नसेन मी

तरीही तुमच्यामध्ये मागे उरेन मी ..

आठवणींचा एक थेंब बनून उरेन मी ...

थंड वारयाची एखादी झुळूक बनून स्पर्श करेन मी ...

ना उरेल देह ..ना उरेल काही ..

उरतील फक्त हि शब्दफुले ..!

ती वेचून ज्याचे मन मोहरले

त्यांच्या हास्यात दिसेन मी ..

त्यांचे समवेत हसेन मी ...

असेन मी नसेन मी

तरीही शब्दगंध बनून सगळीकडे दरवळेन मी

उद्या काय असेन मी ..नसेन मी

तरीही तुमच्यामध्ये मागे उरेन मी ..



सनी ..एक वेडा मुलगा

पझेसिव..............!


तुला सांगू एकदा काय झालं ..

माझ्या बागेतील गुलाबाची..

नुकतीच उमललेली ती अल्लड कळी

तक्रार करत होती ...

आपले गुलाबी गाल फुगवून

तुझ्याविषयी माझ्याकडे ...

सांगत होती ..

"तुझ्या त्या सखीने सर्वांनाच

फितुर केलेय ..अगदी वेड लावलंय....!

सर्वानाच ..अगदी तुझेसारखेच ...!

त्या फुलपाखरांनादेखील...!

कारण..

तुझ्याप्रमाणे आम्हा फुलांना सोडून

ती वेडी फुलपाखरेदेखील

तुझ्याच प्रियेभोवती,

फिरत असतात दिवसभर ....!

अगदी उत्कंठेने बघत असतात

तिचं मोहक हास्य ..तिचं सौंदर्य ..

अतुर होतात ..तिच्या रेशमी स्पर्शासाठी,

तिच्या मधाळ सौंदर्याला टिपण्यासाठी.....! "

अगदी हृदयापासून ..

एक विचारू तुला ..

सांगशील ....?

यात दोष कुणाचा ग ..?

त्या वेड्या फुलपाखरांचा ..

त्या पझेसिव गुलाबी कळीचा ..

माझ्या नाजूक मनाचा ....

कि तुझ्या लोभस सौंदर्याचा .....?


सनी...एक वेडा मुलगा

Saturday, June 11, 2011

माझ्या नविन आयुष्यात.......!

मी करत होतो प्रेम
तेव्हा भाव खात होतीस ,
माझेकडे बघत हि नव्हतीस ..
तू आणि तुझ्या मैत्रिणी
यातच दंग होतीस पण ..
निघून गेल्यावर मात्र आता
आठवणी जपत बसलीस .

तुझ्या एका हाकेवर
मी आली असतो धावून,
एकदा तरी हाक ..
मारायची होती पाहून ..
अखेर मीच थकलो रे
तुझी वाट पाहून.

तू तर त्यावेळी माझी
पर्वा ही नाही केलीस,
माझ्या मनाची अवस्थाही
कधीच नाही जाणलीस.

माझ्या जबाबदारीचं ओझं
तुला घ्यायचं नव्हतं,
मी तरी रे काय करु मला
लग्नाचं नातं हवं होतं.
आयुष्यभर सोबत राहणार ..
हक्काचं माणूस मला हवं होतं ....


माझ्या आयुष्याचा मार्ग
मीच मग निवडला,
आई बाबांनी शोधलेली मुलगी
जोडीदारीन म्हणून स्वीकारली

माझ्यावरचं प्रेम बहुतेक
आता तुला जाणवतंय,
पण खुप उशीर झालाय
हेच तुला मला सांगायचंय.

मी नाही जपणार तुझ्या
कुठल्याच आठवणी भविष्यात,
कारण मी खुश आहे आता
माझ्या नविन आयुष्यात.......!


सनी ...एक वेडा मुलगा

सासरी जाताना ...!


एकदा तिनं सहज प्रश्न केला ..
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं..?
मलाही पटलं काय चुकतंय तिचं ..
खरा तेच बोलतेय ना ..?

आपली माणसं सोडून तीनेच का जायचं..?
परक घर आपलं का मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव लावायची ..?

पण नंतर समजावले तिला
अगं वेडे..
हा तर सृष्टीचा नियम आहे
सुंदर नदी ..शांत.. खेड्यातून ...
रानावनातून वाहणारी ..खेड्याची लाडकी पोर ..
ती नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून.....!

तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून..
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळतेच ना ..?
आपलं सार जुन अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते.....!

एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही विसरते आपले अस्तित्व ..
तीही सागरच तर होते..
विशाल ..अद्भुत ..
आणि म्हणूनच तिच्याचपुढे ...
नेहमी नतमस्तक होतात ना लोकं..!
आणि आपली पापं धुवायला ....
समुद्रात नाही गंगेतच जातात ..
ना लोकं .....?