Tuesday, September 27, 2011

माझी दीदी ..एकदम साधी ..


माझी दीदी ..एकदम साधी ..
शाळेत जाताना .. मला बोटाला धरून नेणारी ..
लंच ब्रेक मध्ये ..तिचे जेवण सोडून ..
धावत पळत येऊन माझ्या डब्याची चौकशी करणारी ...
शाळा सुटल्यावर परत हात धरून घरी आणणारी ...!

मला आठवतय...
अर्धि जास्तीची पोळी.. माझ्या ताटात वाढणारी ...
स्वतःच्या हाताने पोळीचा घास भरवणारी ...
अन..तिच्या खरेदीच्या आधी माझी खरेदी करणारी ..
नेहमी माझ्या चुका समजून घेणारी..
आणि कायम मला पाठीशी घालणारी ...!

माझी दीदी तशी एकदम साधीच ..
आईचे छत्र हरवल्यानंतर ..
आईची माया देणारी ..
कधीही अंतर न देणारी ..
आईची उणीव कधीही जाणवू न देणारी ..!

माझी दीदी एकदम प्रेमळ ..
थोडीशी शांत ..पण गोड हसणारी ..
खूप विचारपूर्वक निर्णय घेणारी ..
ती बरोबर असली कि ..वाटतं ..
या विशाल वटावृक्षाखाली छोटेसे रोपटं
त्याच्या पारंब्या धरून वाढतय ....!

वयाने पण फार मोठी नाहीये ती ..
पण अनुभवाने आभाळ व्यापलाय तिने ..
मित्र हि तीच ..
मैत्रीण हि तीच ..
माझी सखी हि तीच ..
मार्गदर्शक हि तीच ..
माझा आदर्श हि तिच ...!

तिचे हास्य बघायचेय तुम्हाला ..
मग फक्त मला हसताना बघा ..
कशी मनमोकळे हसते ती ...
तिच्या या हास्यासाठी तर मी आज हसतोय ..
मी नेहमी हसरा असू दे ..
असं रोज देवाकडे मागतोय ....!

खूप छान आहे हो माझी दीदी ..
पण एक दिवस जाईल सोडून मला ...
आपल्या सासरी ...
तेव्हा .............?

For the Last Dance…for The Last Time……… !


आठवणीत तुझ्या जगता जगता ..
प्रकाश हा विझता विझता ..
उगवते रात्र ..निजता निजता ..
संपते सारी रात्र ..तुझ्याच आठवणीत ..
कुढतो मी प्रत्येक रात्र ...फक्त तुझ्याचसाठी ..
येशील का ग माझ्यासाठी ..एकदाच ..
For the Last Dance…for The Last Time……!

असावी ती रात्र फक्त तुझासाठी
तू असावीस फक्त माझ्यासाठी ..
सामवून जावे तुझ्या उबदार मिठीत ..
अनुभवावा तुझा हळुवार स्पर्श ..
ओलेचिंब व्हावे प्रणयात तुझ्या सहर्ष ..
देशील का ग हे अनमोल क्षण ...माझ्यासाठी ..
Shall v Dance…Together… For the Last Time……!

कदाचित नसेल उद्या तू माझ्यासाठी
नसेल हि उद्या तुझा स्पर्श ..
नसेल हि तुझे प्रेम
नसेल हि तुझा सुगंध .
असेल फक्त तुझी आठवण ..
हीच असेल माझी साठवण ..
देशील का ग ह्या आठवणी.. तू मला
माझ्यासाठी ..तुझ्यासाठी ..जगण्यासाठी ..
येशील का ग एकदाच ..फक्त माझ्यासाठी
For the Last Dance…for The Last Time……… !

व्याकूळ मी तुझा चंद्रमा ..
शोधतो रोज ताऱ्यात तुला ..
निखळतेस येताच नजरेत रोज ..
त्या चांदण्या रात्रीत जगताना ..
पाहतो रोज तुला माझ्या मिठीत सामावताना ..
येशील का ग सखे ….एकदाच..
For the Last Dance…for The Last Time……… !
Shall v Dance…Together… For the Last Time……….!

सनी..एक वेडा मुलगा

एका झाडावर एक चिमणा ..

माझ्या घराजवळील आंब्याच्या
एका झाडावर एक चिमणा ..
एका चिमणीच्या बाजूला राहीचा ..
तिला नकळत तो तिच्यावर ..
जीव ओतून निरागस प्रेम करायचा ...!

त्याला आवडायचे तिचे कोमल अंग
तिचा रेखीव राखाडी रंग ...
तिच्या चिव -चिव म्हणायच्या ढंगावर ..
तो अतोनात जीव ओतायचा ..
तिच्या नकळत ..
रोज तीचेकडे पाहत राहीचा ...!

तो तिचं घरटं बांधायचा..
तीचेसाठी चारा-पाणी आणायचा ..
ती चिमणी हि रोज हक्काने ..
तो काहीतरी आणिल याची वाट पाहीची ..
एकंदरीत तो तिला खूप खुश ठेवायचा ....!

हे त्याचे उपकार नाही
हे त्याचं प्रेम होतं
काहीही झाले तरी ..
तिच्या डोळ्यात पाणी नाही ...
तर त्याला तिला खूषच पहायचं होतं....!

पण ..
त्या चिमण्याचे प्रेम त्या वेडीला कधीच कळालं नाही..
म्हणूनच त्याचं प्रेम त्याला कधीच मिळालं नाही ..
अन मग एक दिवस ..
तिचं दुसऱ्या चिमण्याशी लग्न झालं....!
तो एकांतात रडला ..
तडफडला ..
दोन दिवस ..
त्या घरट्यात पण आला नाही ...!
पण तिला काहीच बोलला नाही ...
कारण ..
त्यातही त्याने तिला खुश होतानाच पाहिलं ...
आणि त्याचं प्रेम त्याच्या हृदयातच राहिलं..

अजूनही तो त्याच झाडावर ..
तिच्या बाजूलाच राहतो ...
तिला आपल्या हृदयातच ठेवतो ..
ती नसताना तिच्या मुलांना सांभाळतो ..
तिच्या मुलांशी खेळतो ..
स्वतःला रडावसं वाटलं तरी ..
तिला खुश ठेवायचा प्रयत्न करतो .....!


सनी ,,,एक वेडा मुलगा

Saturday, September 10, 2011

रडावे अगदी गळ्यात पडून ज्याच्या ..



तुझ्याही मनात असेल ना ..
कुणीतरी ..आपला ..
अगदी हक्काचा ..
नसेल हि तो तुझा मित्र , नवरा , भाऊ ...
पण टाकतेस न ओवाळून जीव त्याचेसाठी ...!
असतोच तो खूप स्पेशल तुझ्यासाठी ..
अगदी तुझे दुसरे हृदयच जणू ..
स्वप्नातून घडवलेला ..परिपूर्ण सखाच तो ...!

काय कमी आहे तुला ...
आहेत सर्व सुखाची साधने ..
प्रेम ..पैसा ..ऐश्वर्य ..सौंदर्य प्रसाधने ..
जे सर्व स्रियांना हवे असते ..!
तरी पण ..
जेव्हा खूप एकटे वाटते
भरभरून रडावेसे वाटते ..
कदाचित जुन्या आठवणीने ...!

करते न अपेक्षा
यावे त्याने धावत ..न सांगता ..
घ्यावे तुला मिठीत पवित्र मनाने..द्यावा आधार ..
आणि रडावे मुसमुसून त्याचे खांद्यावर डोके ठेवून ..
करावे मन मोकळे ..
अगदी हक्काने, असा....!

त्याने हि शांत रहावून समजावे तुला हळूच पाठीवर थोपटत ..
स्वतः भिजत ..
समजावावे तुला अगदी लहान बाळासारखे ..
खूप जवळचा वाटतो न तुला ..
अगदी सासरी जातानाही ..
रडावे अगदी गळ्यात पडून ज्याच्या ..
घ्यावा निरोप त्याचा ..
त्याला डोळ्यात साठवून .....!

असावा समोर तुझ्या तो ..
जेव्हा बसलेली असते रुसून ..गाल फुगवून ..
जेव्हा असते दु:खात .. खुपत असते कुठली तरी वेदना ..
कुठे तरी जिंकता-जिंकता हरलेली ..
न जमलेल्या कवितेवर राग काढत बसलेली ..
यावे समोर त्याने आपले हसू दाबत ...!

मारावी टिकली तुझ्या नाकावर .. वेडू काय झाले म्हणत ..
लावावा मलम खुपत असलेल्या जखमेवर ..
दाखवावे नवीन स्वप्नं..
पुन्हा एकदा नव्या दमाने जिंकण्याचे ..
अन पूर्ण करून द्यावी कविता ..नवीन ओळी टाकत ..!

करावे लाड तुझे अगदी लहान बाळासारखे ..असा
आहे न कुणीतरी ... मनात अगदी कृष्णासारखा ...
फक्त तुझाच ... ज्याला कुठलेच नाव नाही देता येत असा ...
मनाच्या कोपरयात राहणारा ..
हृदयाच्या कप्प्यात साठवलेला ..
एक ...
अज्ञात ..
निनावी ..?


सनी ..एक वेडा मुलगा ..!

Monday, September 5, 2011

माझ्या मनातला कोपरा ....


खूप दिवसापासून बंद असलेली ..
मनाचे दार आज अलगद उघडले ...
खूप धूळ बसली होती भिंतीवर ..
हलकीशी फुंकर मारली कडी - कोंड्यावर ..!

हळूच आत डोकावले ..आणि
विचारले स्वतःलाच ...
आज पर्यंत काय काय गमावलेस ..
आणि किती कमावालेस ...!
दुनियेच्या या बाजारात ..
विकत तर घेतलं सगळं..
पण स्वतःला विकत घ्यायची ..
किंमत नाही परवडली ...??

एक पाऊल अजून थोडे पुढे टाकले ..
गेलो हळूच मनाच्या कोपऱ्यात ..
दबक्या पावलांनी ..!
माहित होते ..थोडा जरी आवाज केला ..
तर हरवेल सर्व काही ..
नाजूक मन माझं आज पडलंय एकाकी ..
पत्यांचा बंगलाच बांधलाय जणू ...
वापरून माझ्या आठवणींच्या भिंती ..!

आजूनही तसाच आहे ओलावा डोळ्यात ...
अन स्पर्शामध्ये गारवा ...
थरथरते हाताने घेतले मनाला कुशीत ...
प्रेमाने विचारले त्याला ..
कुठे दुखतंय-खुपतंय का रे काही...
त्यालाही खूप मोकळे वाटले ...
अन मग समजले ...
कित्तीशी दु:ख त्याने ...
आपल्या पोटात अशीच लपवलीत...!

खूप वाईट वाटले मला मनाबद्दल ..
आता वचन दिले त्याला ..
नाही बनू देणार त्याला ..
परत आठवणींचा पिंजरा ...
किती हि येऊ देत डोंगर दु:खाचे ..
एकटाच समोरा जायील दु:खाच्या लाटांना ..
पण ..
सतत हसरा ठेवील माझ्या मनातला कोपरा ..!


सनी ..एक वेडा मुलगा ...!

मला आता पोझीटीव थिंकिंग करायचंय ..


मला आता पोझीटीव थिंकिंग करायचंय ..
आणि हसत हसत -खेळत खेळत जगायचंय ..
उरलेले आयुष्य मला आनंदित करायचंय..
जीवनातील प्रत्येक क्षण मला अनुभवाचाय....!
मनाचा प्रत्येक हट्ट मला पुरवयाचाय ...
आणि म्हणूनच आज मी ठरवलंय ..
आजपासून हसत -खेळत जगायचंय ...!

मनातील कल्पनांना ज्वलंत रूप द्यायचंय ..
अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवायचंय ..
आयुष्याच्या लोखंडावरून परीस फिरवायचयं..
त्यासाठीच फक्त ..
मला हसत -खेळत जगायचंय...!

येणाऱ्या काळात फिनिक्स पक्षासारखी ..
झेप घेऊन नव्या उमेदीने उभं राहिचय ..
अश्रुनी नाही तर आनंदअश्रुनी भिजायचयं...
हरवलेल्या माझ्यातील " मी " ला परत आणायचयं....!

पाहिलेले सर्व स्वप्न मला सत्यात आलेलं पाहिचयं..
त्यासाठी वेळ आली तर लढायला सामोर जायचंय ..
पण आता काही झाले तरी मागं नाही पाहिचंय ...
म्हणून ..आजपासून ..
मला हसत -खेळत जगायचंय...!


सनी ...एक वेडा मुलगा

जिच्यात मी हरवून जावे ....!


असायला हवी अशी एकतरी
जिच्यात मी हरवून जावे
शोधताना आपण तिलाच
समोर येवून ती उभी राहावी ....!

 असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे ......!

ओठातले शब्द माझ्या मग
अलगद तिने टिपून घ्यावे
अबोल अशा डोळ्यातील माझ्या
भावना तिने समजून जावे ......!

असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!

बोलली नाही माझेशी थोडा वेळ जरी
इकडे मी अस्वस्थ व्हावे
अश्या वेळी तिने मग बोलुनी काही
मौन आपले माझ्यासाठी सोडावे .......!

असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!

रागावले जरी तिला कोणीही
घाव माझ्या हृदयात व्हावे
इजा झाली माझ्या अंगी तर
आईग .... तिने म्हणावे .......!

असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!

भांडण झाले आमच्यात कधीतरी
तर मीच रोखून मला माघार घ्यावी
चूक माझी असो कि तिची असो
मीच जवळ घेऊन तिला " स्वारी " म्हणावे ...!

असायला हवी अशी एखादी तरी
जिच्यात मी हरवून जावे ....!

हरलो जरी मी भांडताना तिच्याशी
तरी तिने हसत हसत मला जिंकावे
हसू पाहता गालावरचे तिचे वाटे मला
मी नेहमीच तिच्या हास्यासाठी हरावे ...!

असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे ....!

भेटली अशीच कुणीतरी मला मग
याला स्वप्नं कशे म्हणावे
जरी उतरले हे स्वप्नं सत्यात तरी
माझे हे पाहिलेले स्वप्नं फसवे नसावे .....!

असायला हवी अशी एखादी तरी
जिच्यात मी हरवून जावे ....!

सनी ..एक वेडा मुलगा ....!
See More

पुन्हा एकदा देवा मला लहानपण दे ..


पुन्हा एकदा देवा मला लहानपण दे ..

तोच बसायचा कट्टा अन तीच जुनी शाळा
शेतातली पाऊल वाट अन तोच मित्रांचा मेळा
थंडगार झरयातले खळाळणारे पाणी ...
पाणी उडवत चालायचे तसेच आनवाणी...!

अण्याने फेकलेली विट्टी ..पिन्याने मारलेला फटका ..
बोरे काढता काढता लागलेला उन्हाचा चटका ..
भाऊमाळ्याने पकडलेली पेरूची पिशवी ...!
मास्तर ने टेबलावर उभे केलेले रम्या आणि तुळशी

पळण्याची शर्यत अन मित्रांची फसगत ..
अर्ध्यातून शाळेतून पळून जाण्याची गम्मत ..!
राणी आणि पक्याचे भांडण ..आम्ही राणीची बाजू घेणं ..
पक्याचा आमच्याशी अबोला आणि चार दिवस शाळेत न येणं..

पी.टी. चे शिंदे सर आणि त्यांच्या कवायती
त्यांना टाळण्यासाठी मग अफलातून युक्ती ..
दुसऱ्यादिवशी सकाळी मग छडीचा मार ..
त्यानंतर एकतास पक्या हात दाबून दाबून बेजार ..!

तिचा तो चोरून पाठलाग अन मागे बघून तिचं हसणं ..
पृथ्वीवर जणू उतरलं त्यादिवशी चंद्राचं चांदणं ...
तिच्या अबोल डोळ्यात दिसायची मला प्रेमाची खुण ..
कुठेच काही नाही तरी मित्रांची पार्टीसाठी भुणभुण ...!

आजही आठवतात ते गोड दिवस त्या गोड आठवणी
नकळत सर्व आठवल्यावर डोळ्यात भरून येतं पाणी
कधी कधी वाटते पुन्हा एकदा लहान व्हावे
कधी हि न संपणाऱ्या स्वप्नात रमून जावे ...!

परत एकदा देवा मला माझे लहानपण दे ..
साथ मित्रांची असो आणि सहवास तीचा दे ...!

सनी ..एक वेडा मुलगा ...!

आज रक्षाबंधन ...


ख़ुशी सगळीकडे आज .. आज रक्षाबंधन ...
आईची ममता घेऊन आली माझी लाडकी बहिण ..
जरी दोघांचे जन्म वेगवेगळे झाले..
एकच हृदय दोन जागी जणू ईश्वराने केले ..

आज आला रे आला रक्षाबंधनाचा सण...!
वेदना विचारावी त्या भावाला ज्याला नाही रे बहिण ...!

चांदी - सोन्याहुन जास्त किंमत आज ..
तिने बांधलेल्या राखीला ..
जन्मोजन्मीची पुण्याई मिळे जणू या अभाग्याला ...
तिच्या कंकणाचा आवाज गोड पैजणांची धून ..
माझ्या घरात करते जणू सुखाचे शिंपण ...
इडा पिडा दूर पळवी माझं करून औक्षण...!

आज आला रे आला रक्षाबंधनाचा सण..!
वेदना विचारावी त्या भावाला ज्याला नाही रे बहिण ...!

नको रे देऊ पैसा अडका नको तिला जरतारी साडी ..
नाही मागत तुझी दौलत फक्त देरे माया थोडी..
क्षणात धावत येईल बघ हाक एकदाच तू देऊन ..

आज आला रे आला रक्षाबंधनाचा सण..
वेदना विचारावी त्या भावाला ज्याला नाही रे बहिण ...!

सनी ...एक वेडा मुलगा ..( ज्याला सखी बहिण नाही .)

माझी मैत्रीण ....!


काय यार रोज रोज हि डोकं खाते ..
मित्रानो तिची नेहमीच तक्रार असते ..
कि मनातले काही बोलत नाही ..
फक्त तीचेपुढेच मी माझं ..
मन कधीच खोलत नाही ...!

खुपदा समजावले तिला ...
तुझ्या शिवाय मी जगूच शकत नाही ..
तिला वाटते मी वर वर बोलतो ..
मग तीही माझेशी बोलत नाही ....!

असंच मग दोघेही शांत ..
नातं वाढायला मर्यादा ...
का पण कुणास ठाऊक ..
माझं प्रेम तिला दिसत का नाही ..?

नशीब माझं तिचा अबोला ..
जास्त वेळ टिकत नाही ..
एकदा कि सुरु झाली कि ..
मग थांबता थांबत नाही ...!

मान्य आहे नसतील कळत ..
तीचेसाठी लिहिलेल्या माझ्या कविता ...
पण काळजी करणारी माझी नजर ..
तिला कशी कळत नाही ..?

मलाही आवडते ती ..तिचा अल्लडपणा ..
तिने माझेवर हक्क सांगणे
मलाही अशी मैत्रीण गमवायची नाही ..
म्हणून मीही कधीच बोलत नाही
मनात तर तीच असते नेहमी माझ्या ..
हे गुपितही कधी खोलत नाही .....!


सनी ..एक वेडा मुलगा ...

मी कोणासाठी एवढी वेडी होईल ..


माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ..
तू मला खूप आवडतोस ...
हे जेव्हा मी तुला बोलली होती ..
खूप काळ बंद असलेली मनाची खिडकी ..
मी तेव्हा पहिल्यांदा खोलली होती ..!

माझ्या मनातील भावना तुला सांगताना ..
तुझ्या विषयी प्रेमाचे बोल बोलताना ..!
मी मनातून खूप घाबरले होते रे ...
पण माझे प्रेम वेक्त करायला असुरले हि होते रे ...!

मी कोणासाठी एवढी वेडी होईल
असे कधीच वाटले नाही
कुणी एवढा आपलासा होईल ..
असा विचार पण मनात आला नाही ...!

जेव्हा जेव्हा तुला मी दुरूनच पाहीची ..
तू समोर आला कि मनात चलबिचल व्हायची ..
फक्त तुलाच पाहत बसावेसे वाटायचे ..
पाहता पाहता आपल्या आयुष्याचे स्वप्न मी रंगवायचे ..!

स्वप्नं जी मी पहिली ती खूप सुंदर होती
माझ्या त्या स्वप्नात तुझी साथ होती ...
शेवटी एकदा धीर करून बोललीच मी तुला ...
मनात काय आहे माझ्या शेवटी कळलेच तुला ..!

तू जरी आज माझा नाहीस ...
ते क्षण तर नेहमीच आठवणीत राहतील ..
आणि ..
डोळ्यांना तर अश्रू सोबत देतच राहतील .......!


सनी ...एक वेडा मुलगा ....!

तुला माहीतही नाही ...


तुला माहीतही नाही ...
कितीदा मी मनाशी ठरवलं ..
तुला ...
माझ्या मनातलं कधीच नाही सांगायचं..
कितीदा ..माझ्या ओठापर्यंत आले ... पण मी तसेच ...शब्द पुन्हा मागे नेले ...
पाहिजे तर पाषाण हृदयी म्हण ..
भावना शून्य म्हण ...
पण ..
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ..
हे सांगायचं धाडसच नव्हतं माझ्यात .....!

तसे तर तुझ्याशिवाय नव्हते ...
कुणीही माझ्या आयुष्यात ...
तुलाही माझ्या भावना कधीच कळल्याच नाही ....
कदाचित ...
चूक तुझीही नसेल .....!

मी वेक्त नाही केले माझे प्रेम ..
यावरून तुला वाटते ...
माझे प्रेम खोटे असेल ..?

एक सांगू तुला ...
जीवनात एवढे दु:ख मिळाले कि ...
दु:ख लाच सुख मानावे लागले ...
मिळालेल्या दु:खातून कितीदा ..
दाखवण्यासाठी जगाला ..
बऱ्याचदा खोटे हसावे लागले ..

माझे प्रत्येक दु:ख खूप वेळा ..
कवितेतून प्रकट होत होतं ...
मी विचारच केला नाही कधी ..
कवितेला याचं किती दु:ख होतं...?

सनी ..एक वेडा मुलगा ...!

कित्ती कठोर हृदयी असशील ग ..
आता पर्यंत सगळं विसरली असशील ...
आपल्याला ओलाचिंब करणारा तो पाऊस ..
अंगाला शहारे आणणारा तो मोहक वारा ..
तो आपला सुमुद्र किनारा ..
तुला माझा होणारा स्पर्श ..
शब्दांचा पिसारा ..
मंदिरावरच्या पायऱ्या
पायऱ्या वर माझी वाट बघत बसणारी ती वेळ .......!

माझी आतुरतेने वाट बघणारी ती नजर ..
जीवाची घालमेल ..
तुला माझी आवडणारी कविता ..
कावेतेतले शब्द ..
शब्द शब्दात उमटणार तुझं चित्र...
आणि तू ती कविता वाचून मंत्रमुग्ध होणं .......!

तुला आठवतंय ..
तेव्हा तू जेव्हा समोर यायचीस
माझा श्वासात श्वास अडकायचा
तुझ्या गोड हसण्याने
माझा जीव किती ग कासावीस व्हायचा
घाबरून मग हळूच तू माझा हात हातात घ्यायची
आणि तुझ्या नाजूक स्पर्शाने मी सर्व विसरून जायचो ...!

विसरलीस न सगळं ...
त्या सर्व आठवणीही आता बुजल्या असतील ...
पण ...
मी नाही विसरलो ..काहीही
तुझी आठवण आली कि
त्याच किनाऱ्यावर बसतो
पायाला भिजवणाऱ्या प्रत्येक लाटेत ..
तुझं अस्तित्व शोधतो ......!

रोज रात्री आकाशाकडे बघतो ..
अन तू दिसशील म्हणून उगाचच ..
तारा..निखळण्याची वाट पाहत बसतो ...
प्रत्येक वेळी आरशात मला ..
तूच दिसत राहते ..
अन..तुला बघता बघता ..
माझे रोज आवरायचे राहून जाते ....!

पण मी हि प्रयत्न करतोय ..
पण कसे विसरू ..
तुझे काळेभोर डोळे ..डोळ्यातील अंजन ..
लाजणारे शब्द ..गालावरची खळी ..
तुझ्या केसात दरवळणारा मोगरा ..
तू दिलेले गुलाबाचे फुल ..
त्याची ती पाकळी ..
तीही आता सुकून गेलीये ..
तुझ्या विना ....!



सनी ..एक वेडा मुलगा .....!

तुझी आठवणं काढता काढता ..


प्रेमात हार-जीत मी कधी मानलीच नाही ..
तरीही तू जे केले ते सांगायचे राहून गेले ..
पराभव स्वतःचा स्वीकारताना ...तू
दिलेल्या वेदनांनी काळीज पिळून गेले ..
जिंकून सुद्धा हरताना ...
शेवटी मनातले सांगायचे राहून गेले ...!

तुझी आठवणं काढता काढता ..
डोळ्यातील अश्रू सुद्धा सुकून गेले ...
वाट तुझी बघता बघता ..
डोळे माझे मिटून गेले ...
मग या अश्रुचे तेजाब होताना ...
शेवटी तुला जे सांगायचे ते राहून गेले ...!

निर्दयी तुला समोर बघून ...
ठोके काळजाचे सांभाळताना ...
हृदय माझे बेभान झाले
शेवटचा श्वास घेताना देखील ...
शेवटी तुला जे सांगायचे ते राहून गेले ...!

तुझ्या अथांग मनाचा किनारा शोधताना ..
पाय माझे अधीर झाले ..
भावनांचा हा खेळ मांडताना ..
शब्द माझी साथ सोडून गेले ...
तुला समजून घेता घेता ..
शेवटी ...तुला जे सांगायचे ते राहून गेले ...!

सनी ..एक वेडा मुलगा