Saturday, December 3, 2011

खरच..आता तू खूप बदललीये ...!

आठवतंय मला आजही ...
मी न बोलताही माझ्या ...
मनातले सारे ओळखणारी तू ..
आज सारे समजूनही ...
न समजल्यासारखे करतेस ...
खरच..आता तू खूप बदललीये ...!

मला भेटल्याशिवाय तुझा ..
एक दिवसही जायचा नाही ...
पण आज तुझ्या भेटीसाठी ..
एक एक क्षण मोजलाय..
पण ..दुरावा हाच मात्र रोजचा सोबती झालाय ...!

न चुकता मला माझा आवडणारा ..
गुलाब देणारी तू ..
हल्ली विसरू लागलीस ..
पण जाऊ दे ग ...मी रमेल ..
त्या जुन्या गुलाबी आठवणीत ..
शोधेल मी तेथे माझा सुगंध कधीतरी ..
माझा जीव रमवण्यासाठी ...!

माझा हात हातात घेण्यासाठी ...
किती बहाणे करायचीस ..
अक्षरश: तडफडायेचीस ..
पण आता ...
कुणी बघेल ..हा बहाणा सांगून ...
टाळायला लागलीस ..
दूर राहू लागलीस आजकाल माझेपासून ..
का ग ..एवढे परक्यासारखी वागू लागलीस ?

पण व्हायचे तेच झाले ..
माझे स्वप्नं अधुरेच राहिले ...
माझे डोळे भरून येणे तुला कधी सहन नाही झाले .
पण आज माझे डोळे अश्रू ने ओलेचिंब झाले ..
आणि तू ..
अगदी कोरडी ठणठनीत निघून गेलीस ..
मला एकट्याला सोडून ..
एकदाही मागे वळून न पाहता ..!

कालपर्यंत फक्त माझी असणारी तू ..
आज दुसऱ्याची झालीस ..
काही तक्रार नाही ग प्रिये ..
तू फक्त खुश राहा ..
तुझ्या खुशीतच मी माझा आनंद शोधलाय ..
जाईल मंदिरात पुन्हा एकदा ..
आणि घालील साकडे ....
कसलाही पाझर न फुटणाऱ्या ..
त्या दगडाच्या मूर्तीला ...
फक्त ..तुझ्या सुखासाठी ..खुशीसाठी ...!

सनी ..एक वेडा मुलगा.....!

जे तुमचे हृदय बोलते ...!

जेव्हा कुणीतरी अनोळखी ..
तुम्हाला समोर दिसते ...
जेव्हा तिची नजर ..
प्रथमच एका नजरेशी भेटते ..
लक्ष फक्त तिकडेच द्या ...
जे तुमचे हृदय बोलते ...!

या प्रक्टीकॅल दुनिया पेक्षा अनुभवा ..
एक वेगळीच दुनिया ...
लक्षात ठेवा ..
Love at First Sight ...पहिल्या प्रेमाची ..
हीच आहे किमया ...
होऊन जा बैचेन ..
तिच्या रम्य आठवणीत
केवळ तिला पाहण्यास ..
हळूच घ्या मिठीत ..
ती स्वप्नात आल्यास ...
अनुभवा तिचा तो उबदार स्पर्श ..
हळूच विचारा मग मनाला ..
किती रे झाला हर्ष ....!

गोड आठवणीत तिच्या होऊन जा बेधुंद
श्वासात तुमच्या दरवळू द्या ..
फक्त तिचाच सुगंध ..
भेटून एकदा तिला निवांत ..
घ्या जवळ तिला ..अन
सांगा एकदा मनातलं...
अशक्य असं काहीच नाहीये ...!


सनी ..एक वेडा मुलगा ..!

पुन्हा.. फुलेल का आपली प्रीत ....?


आठवतंय तुला ..एकमेकांचा
निरोप घेताना मन भरून आलं होतं ..
डोळ्यातले पाणी पापणीआड दडवून ..
खोटं खोटं हसलो होतो ..
नातं टिकवायचं आपण आयुष्यभर ..
असं मनोमन ठरवलं होतं ..!

सोबत आहे आपल्याला
एकमेकावरील विश्वास आणि प्रेमाची ..
पण मधेच आड आली भिंत ..
घरच्यांच्या प्रतिष्ठेची ...
कदाचित ..त्यांचेसाठी तुला ..
दुसऱ्याशी लग्न करावे लागले ..
तुझा सर्वस्व असणाऱ्या मला ..
त्यांचे साठी दुखवावे लागले ...!

सहन झाले नाही मला ..
दुखवू हि नये तुला म्हणून ..
मी मरणाचा विचार केला होता ..
पण तुझा विचार केल्यावर ..
आपोआप पाऊल अडले माझे ..
फक्त ...तुला दिलेल्या वचनांसाठी
मी हेही सहन करेल ...
जगेन मी ...
जगेन कसा ? रोज तिळ तिळ मरेल ...
तू माझी असतानाही ..
तुझा विरह सोसेल ....!

तुझ्या आठवणीत जगताना ..
कधी कधी मी रडतानाही हसेल ..
ओढ असेल तुझ्या मिलनाची ..
वाट पाहत असतील डोळे ..
फक्त तुझ्या येण्याची ...
मला काही कळत नाही
हि माझ्या प्रेमाची हार कि जीत ...
प्रिये ...सांग न मला एकदा ....
पुन्हा.. फुलेल का आपली प्रीत ....?



सनी ..एक वेडा मुलगा ...!

येतेय ग आठवण.... तुझी


येतेय ग आठवण.... तुझी आजही ...
कुणाचीही परवा न करता ..
कोसळणारा मुसळधार पाऊस पाहताना ..
सहजच हात लांब करून ..
तळहातावरील झेललेले पाणी ..
अंगावर उडत असताना .....!

कायम असते मनात ...
अथांग महासागर एकटा ...
बघत असताना ..
त्याच्या लाटा पायाला स्पर्शून जाताना ...
ओल्या चिंब पावसात भिजताना ...!

येते तुझी आठवण ..
संध्याकाळी गरम चहा पिताना ..
आभास होतो मलाच ..
झाला आहे स्पर्श त्याला तुझ्या ओठांचा .....!

येते आठवण तुझी...
जेव्हा जमून बसतात श्रावणातले ढग ...
बरसण्यासाठी ..
वाटते ...कदाचित वाट पाहत असतील तुझीच ..
माझ्या सारखीच ..!
तुला चिंब -चिंब भिजवण्यासाठी ...!

पण आता ठरवलंय ...
एकदा शेवटचं मागे वळून ..
पुन्हा आता नाही आठवायचे
विसरलेल्या आठवणींना ..
नाही फसायचे पुन्हा एकदा ..
चुकार हळव्या क्षणात ..
नाही बाळगायचे अपेक्षांचे ओझे ..
मनावर पुन्हा ....!

जास्त नाही रेंगाळायचं...
त्या नागमोडी रस्त्यावर ..
नाही घसरायचे पुन्हा त्या ...
निसरड्या वाटेवरून ...
स्वतःच्या हाताने स्वतःला ..
सावरायचे ...
आणि स्वतःचे आयुष्य आपण ..
स्वतःच घडवायचे ...!
आणि रंगीन करायचे आपले आयुष्य ...
त्या सप्तरंगी इंद्रधनूप्रमाणे ...!



सनी ..एक वेडा मुलगा ...!

Wednesday, November 16, 2011

सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तुझे सुंदर , नाजूक , मुलायम पाय ..
चिखलाने भिजतील म्हणून ...
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तू आणि तुझे रूप पाहिचे आहे मला भिजताना ..
बघायचे आहे तुझ्या ...
ओठावरती ते थेंब हि थांबताना ..!
पाहिचे आहे हळुवार तुझ्या ...
केसावरून पाणी ओघळताना ..म्हणूनच ..
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

पण तू आलेवर असा बरस ..
कि उशीर होईल तुला घरी निघताना ..
आणि तू अलगद यावीस बाहूत माझ्या ...
स्वतःला सावरताना ...
कर मोठा कडकडाट विजेंचा आज ..
कि तू सोडूच नये बाहू माझे आज ..
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

बेधुंद होऊन तू बरसत राहा आज ...
तू जवळ असताना ..
जर कमी पडले थेंब आज बरसताना ..
तर घेऊन जा आनंदाश्रू आज जाताना ...!
सांगितले नको येउस आत्ताच ...मी पावसाला ..!

तुझ्या सहवासाठी माझा प्रत्येक श्वास त्याला देईन ..
आणि बदल्यात फक्त त्याच्या श्रावण सरींची वाट पाहीन ...!
सांगितले आहे मी आज त्या पावसाला ...
नको येउस आत्ताच .........!


सनी ..एक वेडा मुलगा ...!

Tuesday, November 15, 2011

तो तर फक्त एक आभास असतो .....!


तुला माहित आहे ...
आकर्षण आणि प्रेम ...
यात एक रेषा असते ...
जी दिसत नाही ...
पुसट कि ठळक ...
ती आपण मारायची असते .....!

मान्य आहे मला ...
प्रेमाकडे जाणारा मार्ग ..
आकर्षणाच्या बोगद्यातून ...
जात हि असेल ...
पण ते एक मायाजाल आहे ...
त्या गहिऱ्या मोहजालात ..
तुला तुझा मार्ग खरच का सापडेल ...?

आकर्षणालाच प्रेम समजून ..
आपण उगीच नकळत वाहत जातो ...
पण थोड्याच दिवसांनी कळतं ..
खरतर तसं काहीच नव्हतं ....!

आपण फक्त धावत असतो उगीच ...
त्या मृगजळाच्या मागे ...
मग लक्षात येते ..
क्षितिजापर्यंत दिसणारे ते पाणी ...
नसते ..
तो तर फक्त एक आभास असतो ...!


सनी ..एक वेडा मुलगा ...!
 

Monday, November 14, 2011

आज तुला नकोसा झालोय ..........


आजकाल माझ्या जीवनाचे
गणितच चुकत चाललंय..
वारंही उलट्या दिशेनं फिरलंय ..
कालपर्यंत तुझ्यासाठी सर्वस्व असणारा ..
मी ...
आज तुला नकोसा झालोय ..
हे मलाही कळतंय ..
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय ...
आणि तू केलेल्या दुर्लक्ष ने मनही जळतंय ...!

एक दिवस असा होता ..
तू रोज सकाळी उठायची ..नटायची ..
माझ्या मागे मागे फिरायाचीस ..
माझा प्रत्येक शब्द तू फुलासारखा जपायाचीस ..
माझ्या एका स्माईल साठी ..
तासंतास माझी वाट बघायचीस ..
रोज डोळ्यात डोळे घालून माझ्या ...
तू त्यात स्वतःच अस्तित्व शोधायाचीस ...!
पण आज सारच बदललंय..
माझं असं काय चुकलं ..?
कि तुझं माझ्यावरचं प्रेमच संपलं....!

जाऊ दे मला सारं आज समजलंय ..
मी तुला नको आहे हे ..
तुझ्या वागण्यावरून जाणवतंय ...!
तरीही त्यात तुझं सुख असेल तर ..
तर मी हि तुला परत भेटणार नाही ..
तू जर आनंदी होणार असशील तर ..
चितेवर झोपायला सुद्धा माझा नकार नाही ..!

पण तरीहि मनात कुठेतरी वाटतंय ...
तुला एकदा तरी माझी आठवण येईल ..
मला शेवटचं बघण्यासाठी मन तुझं आतुर होईल ..
पण तेव्हा कदाचित मी या जगात नसेल ...
कल्पना तरी कशी करू शकतेस तू ..?
तुझ्या पासून दूर मी कसा राहू शकेल ..!

सनी ..एक वेडा मुलगा ....!

मला कुणी कोन्झेरवेटींव बोलले तरी ....!


चालेल मला कुणी कोन्झेरवेटींव बोलले तरी ..
पण याला मी म्हणेल पोझीटीवेली लो प्रोफाईल ...!
तूला कधीच नाही कळले माझे ध्येय ..विचार ..
मला नाही आवडत ..ग
जवळ पाचशे असेल तर पाच हजार दाखवणं ...
 खोटा भपका दाखवण्यापेक्षा ...
लो प्रोफाईल म्हणून घेणं आवडेल मला ..!

तुला आठवतंय ..दोन वर्षापूर्वीचे रिसेशन ..
कोलमडून पडले सर्व आय.टी.वाले ...
पण शेवटी उपयोगात आलीच न माझी ..
अंथरून पाहून पाय पसरवण्याची सवय .. ?
थोडीशी कोन्झेरवेटींव , थोडीशी निगेटीव..
थोडी म्वारल डाऊन करणारी ... पण ..
तुलाहि अभिमान वाटला होता माझा त्यावेळी ..
मला नाही बोललीस ..
पण बोललीस न माझ्या मित्राजवळ तरी ...?

एक सांगू ..त्यादिवशी ..
एक्स्प्रेस हायवे वर स्पीड वाढवायचा मोह ..
चालकाला पण झालाच न ..
तेव्हा तूच बोलली होतीस न त्याला .
अरे स्पीड एवढाच ठेव जेवढा तुला कंट्रोल होईल .
मग हेच आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी का नाही ग लागू होत ...
खर्च एवढाच करूया जेवढा मिळकतीत बसेल ..
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच ..
मी म्हणेन अगदी प्रेम हि एवढंच करावं ..
जेवढं निभावता येईल ..
प्रेमाचा अतिरेक सुद्धा अतिवायीट...!

पण नाही पटत तुला हे सर्व ..
तुला हवा असतो ..वरवरचा शो ..
नाही आवडत ग मला हे सर्व ...आणि म्हणूनच ..
आजकाल आपल्यातलं अंतर नकळत वाढत चाललंय ..!
एक सांगू ..
तू कर्तुत्वाने आणि आर्थिकदृष्ट्या कमी असलीस ..
तेव्हा उंची वस्र घालून ..आणि न झेपणारा भपका दाखवून .
तुला कुणी मोठे म्हणेल का ?
माणसाने वेवसाय वाढावा..करिअर करावे पण ..
माणूस म्हणून साधे आयुष्य जगावं..!

जाऊ दे ..का सांगतोय तुला हे सर्व ..
नाही पटणार कधीच तुला ..
कारण तुला साधं राहणं कधी जमलंच नाही ..
मिडल क्लास मध्ये मिसळणे म्हणजे ..
तुला तुझे स्टेटस आडवे येते ..
पण .. एक माणूस म्हणून जगून बघ ...
खूप सुख आहे ग त्यात ..
दुसर्यांना सुखात आणि आनंदात बघणं..!
करशील का प्रयत्न ...?
नक्की कर .. जमेल तुला ..
माझे काय ग ..मी तर तुझाच आहे ..
बघ नक्की ...कर तर प्रयत्न ...!

सनी ..एक वेडा मुलगा .....!

आयुष्याच्या एखाद्या वळणावर ....!


आठवतेय ..ती आपली पहिली भेट ..
दोघांचीही हि कॉलेज ला जाताना ..
चुकलेली बस ..
खरच बोलता बोलता तू केव्हा माझी झालीस ..
तुलाही जाणवले नसेल ...
तू माझ्या आयुष्यात आलीस ..
आणि कधी माझी सवय झालीस कळलेच नाही बघ ..
एक एक दिवस असाच जात होता ..
आणि तू माझ्या मनावर अधिराज्य गाजवत होतीस ...!

कदाचित तुला मी वेडा वाटत असेल ..
हो आहे मी वेडाच तुझ्यासाठी ...
तुझ्या तिरकस कटाक्षासाठी ...
तुझ्या प्रेमळ मिठीसाठी ..
पण ते तर शक्य नाही आहे ...तुला ...
तुही भावना घट्ट दाबून टाकून ...
निर्णय घेतलाच न ..
आपलं ते प्रेम ..आठवणी ..
एवढ्या सहज विसरू शकशील ..?

कदाचित बोलशील हो .. विसरेन मी सगळं ..
पण हृदयातल्या एका कोपऱ्यात माझ्या साठी ..
जागा नक्कीच असेल ...हे माहित आहे मला ..
कदाचित होईल कधीतरी पश्याताप ..
ऐकशील जेव्हा मनाचं ..तेव्हा ..
फक्त माझंच नाव येईल समोर ...
तेव्हा कोणाला सांगशील कि ....?

कदाचित आयुष्याच्या एखाद्या वळणावर ..
भेटशील मला ..
तेव्हाही मी फक्त एवढंच विचारील तुला ...
काय ग ..खुश तर आहेस ना ..??


सनी ..एक वेडा मुलगा...........!

मी मेलेलाच बरं नव्हतो का ?


खरच किती खुश होतो मी ...
जेव्हा आली होतीस आयुष्यात माझ्या ..
वाटले होते दार उघडले माझ्या स्वप्नांचे ...
पण तू गेलीस निघून ..आणि
मन मात्र स्वप्नातच अडकलं ...!
...
तुझ्यामाझ्या भावी सुखासाठी ...
केल्या किती प्रार्थना ..
जावून छोट्या मोठ्या मंदिरात सुद्धा ...
आता खरच वाटतंय ...
मी नास्तिकच बरा नव्हतो का ..?

तू आलीसच का जीवनात माझ्या ..
एखाद्या निखळ ..झऱ्यासारखी ..
मी या वाळवंटात ..
अतृप्तच राहिलेला चांगलं झालं असतं..
तुझं ते मासूम हास्य ..फुलं उधळायच मनात ..
त्या काट्यानपेक्षा ..
मी निष्पर्नच बरा होतो ग ...!

कदाचित चूक तुझीही नसेल ...
अन माझीही नाही ..
आणि आपल्याला भेटवणाऱ्या नशिबाचीही नाही..
पण तरीही कुठेतरी वाटतंय आता ...
कि मी एकटाच सुखी नव्हतो का ?
जाताना हि माझे सुख , चैन घेऊन गेलीस ..
माझं जगणं घेऊन गेलीस ..
आता तूच सांग ...

मी मेलेलाच बरं नव्हतो का ?


सनी ...एक वेडा मुलगा ..!

एक अलिखित करार करू या ...!

चल... या दिवाळीपासून ..
आपण एक अलिखित करार करू या ...
सर्व काही वाटून घेऊयात ...
गुलाबी थंड पहाट तुला घे ...
रणरणत्या उन्हाच्या झळा मला दे ..!

बागेतील रंगबेरंगी गुलाब हातात तुझ्या ..
टोकदार काटे.. वाटेत माझ्या ...
ओठावर तुझ्या स्मित हास्य खेळावं ..
खारं पाणी माझ्या डोळ्यातच राहावं ...!

भिजेतेस आनंदाने त्या रिमझिम धारा तुला ..
मोठ्या इमारती हि वाहून नेणारा पूर राहूदे मला ..
येशाचे हर एक चढ तू चढावा ..
चढा नंतरचा उतार माझ्या वाट्याला यावा ....!

सुखाचे सर्व अश्रू तुझ्या डोळ्यात यावे ..
आणि दु:खाचे अश्रू मला मिळावे ..
जीवनाच्या वाटेवरील दूरचा रस्ता माझा ..
त्याच रस्त्यावरील एकाच विसावा तुझा ...!

तुझ्या साठी ते ओलेचिंब पावसाळे ..
जन्मभर मला असू दे उन्हाळे ..
काळोख चिरणारा दिवा तुझ्याच घरात ..
अन मी राहावं जन्मभर अंधारात ....!


सनी ..एक वेडा मुलगा ...!

जेव्हा तू कुणावर तरी खरं-खरं प्रेम करशील ...!


रोज सकाळी उठतो ..
अन ..न चुकता देवाची प्रार्थना करतो ..
देवाला पण आता माहिती झालंय ..
मी फक्त तिच्यासाठीच सर्व मागतोय ...
एकदा देवही म्हणाला आरे कधीतरी स्वतःसाठी मागत जा ..
मी त्याला म्हटले तिच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का ?

हसला स्वतःशी च आणि बोलला ठीक आहे माग..
मी बोललो ..
पाहिजे तर मी झोपेन जमिनीवर ..
पण तिला मात्र मखमली गादी दे ...
मला दिवसभराची भूक दिली तरी चालेल पण ...
पण तिला दरवेळी बारा पक्वान्न दे ...
मला भले हि रात्रभर अंधारात ठेव ..पण
तिचे साठी प्रकाशाची अखंड ज्योत दे ..
भरू देत माझे डोळे दु:खाणे पण ..
तिच्या डोळ्यात मला आनंदाश्रू दिसू देत ...
माझा जीव घेतला तरी चालेल ..
पण तिच्या हृदयात माझे स्थान आढळ ठेव ...!

माझ्या मागणे आईकून देव शांत झाला
त्याच्या पापणीची किनार ओली झाली ..
बोलला ..
एवढं प्रेम तिचेवर ..
जिने तुला कधीच स्वीकारले नाही ...
का मरतोस वेड्या एवढे तिच्यासाठी...?
जिला तुझ्या भावनांची कदर नाही ...!

मी बोललो ...
देवा ..तुला सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील ..
जेव्हा तू कुणावर तरी खरं-खरं प्रेम करशील ...!

सनी...एक वेडा मुलगा ...!

सुकलेले फुलं................!


खरच माझे मलाच कळत नाही ..
तू समोर आलीस कि शब्दच ..
निशब्द होऊन जातात ..
डोळ्यातील दाटलेले भाव ..
तसेच पापण्या आड लपून जातात ..!

तुझ्याकडे पहिले कि तसाच ..
पाहत राहतो स्तब्ध होऊन ..
मग तू हि रागावून निघून जातेस ...
एक शब्द हि बोललो नाही म्हणून ...!

तुझ्या साठी चंद्र तारे आणून द्यावे ...
असेही कधी कधी मनात येते ...
पण हे काय शक्य आहे ..
हे लगेच ध्यानात येते ...
मग वाटते फुलच द्यावे ..
पण ते द्यायची पण हिम्मत होत नाही ..
म्हणून त्या वाटेला मी कधीच जात नाही ...!

मग एखाद्या पुस्तकात ते फुल तसेच सुकत जाते ..
आणि रात्रभर केलेली तयारी सर्व वाया जाते ...
मनात काय आहे तुझ्या अजून मला कळले नाही ..
पण माझे हृदय तुझ्याशिवाय काहीच मागत नाही ....!

पण आज ठरवलंय ...
आज तुला सर्व सांगायचय..
तुझ्यासाठीचे आयुष्य तुझ्या स्वाधीन करायचंय...!

कदाचित ...
तुझ्याही एखाद्या पुस्तकात ...
माझेसाठीची सुकलेले फुलं असतील ....!

सनी ..एक वेडा मुलगा ...!

एक दिवस संध्याकाळी ....


एक दिवस संध्याकाळी ....
सहज एकटाच बसलो होतो ..
का ? कळले नाही वाट कुणाची बघत होतो ...
नेहमीच आनंदी आणि हसणारे माझे मन ....
आज अगदी बैचेन अन दु:खी होतं..
रोमांटिक गाणी आईकणारा मी ..
आज SAD SONGS आईकत होतो ...!

संध्याकाळच्या सोनेरी किरणात ..
प्रेमाचा गुलाबी रंग शोधत होतो ..
पुसट दिसणाऱ्या चंद्रामध्ये .....
तिचाच चेहरा शोधत होतो ...!

तिच्यासोबत घालवले क्षण ..
डोळ्यासमोर येवून गेले ..
मावळतीच्या सूर्याला बघून ..
डोळे उगीच भरून आले ...
बेफाम सुटलेले वारा ...
हृदयाला स्पर्शून गेला .
पण भिजलेले डोळे पुसायला ..
कुणाचा हात जवळ नव्हता ...!

खरच ..
तिच्या सोबतच्या गोड आठवणी ...
आज डोळ्यासमोर आल्या ....
थोडेसे पाणी देऊनी कोरड्या डोळ्यात ...
बरच आधार देऊन गेल्या ....!

सनी ,,एक वेडा मुलगा ....!

Tuesday, September 27, 2011

माझी दीदी ..एकदम साधी ..


माझी दीदी ..एकदम साधी ..
शाळेत जाताना .. मला बोटाला धरून नेणारी ..
लंच ब्रेक मध्ये ..तिचे जेवण सोडून ..
धावत पळत येऊन माझ्या डब्याची चौकशी करणारी ...
शाळा सुटल्यावर परत हात धरून घरी आणणारी ...!

मला आठवतय...
अर्धि जास्तीची पोळी.. माझ्या ताटात वाढणारी ...
स्वतःच्या हाताने पोळीचा घास भरवणारी ...
अन..तिच्या खरेदीच्या आधी माझी खरेदी करणारी ..
नेहमी माझ्या चुका समजून घेणारी..
आणि कायम मला पाठीशी घालणारी ...!

माझी दीदी तशी एकदम साधीच ..
आईचे छत्र हरवल्यानंतर ..
आईची माया देणारी ..
कधीही अंतर न देणारी ..
आईची उणीव कधीही जाणवू न देणारी ..!

माझी दीदी एकदम प्रेमळ ..
थोडीशी शांत ..पण गोड हसणारी ..
खूप विचारपूर्वक निर्णय घेणारी ..
ती बरोबर असली कि ..वाटतं ..
या विशाल वटावृक्षाखाली छोटेसे रोपटं
त्याच्या पारंब्या धरून वाढतय ....!

वयाने पण फार मोठी नाहीये ती ..
पण अनुभवाने आभाळ व्यापलाय तिने ..
मित्र हि तीच ..
मैत्रीण हि तीच ..
माझी सखी हि तीच ..
मार्गदर्शक हि तीच ..
माझा आदर्श हि तिच ...!

तिचे हास्य बघायचेय तुम्हाला ..
मग फक्त मला हसताना बघा ..
कशी मनमोकळे हसते ती ...
तिच्या या हास्यासाठी तर मी आज हसतोय ..
मी नेहमी हसरा असू दे ..
असं रोज देवाकडे मागतोय ....!

खूप छान आहे हो माझी दीदी ..
पण एक दिवस जाईल सोडून मला ...
आपल्या सासरी ...
तेव्हा .............?

For the Last Dance…for The Last Time……… !


आठवणीत तुझ्या जगता जगता ..
प्रकाश हा विझता विझता ..
उगवते रात्र ..निजता निजता ..
संपते सारी रात्र ..तुझ्याच आठवणीत ..
कुढतो मी प्रत्येक रात्र ...फक्त तुझ्याचसाठी ..
येशील का ग माझ्यासाठी ..एकदाच ..
For the Last Dance…for The Last Time……!

असावी ती रात्र फक्त तुझासाठी
तू असावीस फक्त माझ्यासाठी ..
सामवून जावे तुझ्या उबदार मिठीत ..
अनुभवावा तुझा हळुवार स्पर्श ..
ओलेचिंब व्हावे प्रणयात तुझ्या सहर्ष ..
देशील का ग हे अनमोल क्षण ...माझ्यासाठी ..
Shall v Dance…Together… For the Last Time……!

कदाचित नसेल उद्या तू माझ्यासाठी
नसेल हि उद्या तुझा स्पर्श ..
नसेल हि तुझे प्रेम
नसेल हि तुझा सुगंध .
असेल फक्त तुझी आठवण ..
हीच असेल माझी साठवण ..
देशील का ग ह्या आठवणी.. तू मला
माझ्यासाठी ..तुझ्यासाठी ..जगण्यासाठी ..
येशील का ग एकदाच ..फक्त माझ्यासाठी
For the Last Dance…for The Last Time……… !

व्याकूळ मी तुझा चंद्रमा ..
शोधतो रोज ताऱ्यात तुला ..
निखळतेस येताच नजरेत रोज ..
त्या चांदण्या रात्रीत जगताना ..
पाहतो रोज तुला माझ्या मिठीत सामावताना ..
येशील का ग सखे ….एकदाच..
For the Last Dance…for The Last Time……… !
Shall v Dance…Together… For the Last Time……….!

सनी..एक वेडा मुलगा

एका झाडावर एक चिमणा ..

माझ्या घराजवळील आंब्याच्या
एका झाडावर एक चिमणा ..
एका चिमणीच्या बाजूला राहीचा ..
तिला नकळत तो तिच्यावर ..
जीव ओतून निरागस प्रेम करायचा ...!

त्याला आवडायचे तिचे कोमल अंग
तिचा रेखीव राखाडी रंग ...
तिच्या चिव -चिव म्हणायच्या ढंगावर ..
तो अतोनात जीव ओतायचा ..
तिच्या नकळत ..
रोज तीचेकडे पाहत राहीचा ...!

तो तिचं घरटं बांधायचा..
तीचेसाठी चारा-पाणी आणायचा ..
ती चिमणी हि रोज हक्काने ..
तो काहीतरी आणिल याची वाट पाहीची ..
एकंदरीत तो तिला खूप खुश ठेवायचा ....!

हे त्याचे उपकार नाही
हे त्याचं प्रेम होतं
काहीही झाले तरी ..
तिच्या डोळ्यात पाणी नाही ...
तर त्याला तिला खूषच पहायचं होतं....!

पण ..
त्या चिमण्याचे प्रेम त्या वेडीला कधीच कळालं नाही..
म्हणूनच त्याचं प्रेम त्याला कधीच मिळालं नाही ..
अन मग एक दिवस ..
तिचं दुसऱ्या चिमण्याशी लग्न झालं....!
तो एकांतात रडला ..
तडफडला ..
दोन दिवस ..
त्या घरट्यात पण आला नाही ...!
पण तिला काहीच बोलला नाही ...
कारण ..
त्यातही त्याने तिला खुश होतानाच पाहिलं ...
आणि त्याचं प्रेम त्याच्या हृदयातच राहिलं..

अजूनही तो त्याच झाडावर ..
तिच्या बाजूलाच राहतो ...
तिला आपल्या हृदयातच ठेवतो ..
ती नसताना तिच्या मुलांना सांभाळतो ..
तिच्या मुलांशी खेळतो ..
स्वतःला रडावसं वाटलं तरी ..
तिला खुश ठेवायचा प्रयत्न करतो .....!


सनी ,,,एक वेडा मुलगा

Saturday, September 10, 2011

रडावे अगदी गळ्यात पडून ज्याच्या ..



तुझ्याही मनात असेल ना ..
कुणीतरी ..आपला ..
अगदी हक्काचा ..
नसेल हि तो तुझा मित्र , नवरा , भाऊ ...
पण टाकतेस न ओवाळून जीव त्याचेसाठी ...!
असतोच तो खूप स्पेशल तुझ्यासाठी ..
अगदी तुझे दुसरे हृदयच जणू ..
स्वप्नातून घडवलेला ..परिपूर्ण सखाच तो ...!

काय कमी आहे तुला ...
आहेत सर्व सुखाची साधने ..
प्रेम ..पैसा ..ऐश्वर्य ..सौंदर्य प्रसाधने ..
जे सर्व स्रियांना हवे असते ..!
तरी पण ..
जेव्हा खूप एकटे वाटते
भरभरून रडावेसे वाटते ..
कदाचित जुन्या आठवणीने ...!

करते न अपेक्षा
यावे त्याने धावत ..न सांगता ..
घ्यावे तुला मिठीत पवित्र मनाने..द्यावा आधार ..
आणि रडावे मुसमुसून त्याचे खांद्यावर डोके ठेवून ..
करावे मन मोकळे ..
अगदी हक्काने, असा....!

त्याने हि शांत रहावून समजावे तुला हळूच पाठीवर थोपटत ..
स्वतः भिजत ..
समजावावे तुला अगदी लहान बाळासारखे ..
खूप जवळचा वाटतो न तुला ..
अगदी सासरी जातानाही ..
रडावे अगदी गळ्यात पडून ज्याच्या ..
घ्यावा निरोप त्याचा ..
त्याला डोळ्यात साठवून .....!

असावा समोर तुझ्या तो ..
जेव्हा बसलेली असते रुसून ..गाल फुगवून ..
जेव्हा असते दु:खात .. खुपत असते कुठली तरी वेदना ..
कुठे तरी जिंकता-जिंकता हरलेली ..
न जमलेल्या कवितेवर राग काढत बसलेली ..
यावे समोर त्याने आपले हसू दाबत ...!

मारावी टिकली तुझ्या नाकावर .. वेडू काय झाले म्हणत ..
लावावा मलम खुपत असलेल्या जखमेवर ..
दाखवावे नवीन स्वप्नं..
पुन्हा एकदा नव्या दमाने जिंकण्याचे ..
अन पूर्ण करून द्यावी कविता ..नवीन ओळी टाकत ..!

करावे लाड तुझे अगदी लहान बाळासारखे ..असा
आहे न कुणीतरी ... मनात अगदी कृष्णासारखा ...
फक्त तुझाच ... ज्याला कुठलेच नाव नाही देता येत असा ...
मनाच्या कोपरयात राहणारा ..
हृदयाच्या कप्प्यात साठवलेला ..
एक ...
अज्ञात ..
निनावी ..?


सनी ..एक वेडा मुलगा ..!

Monday, September 5, 2011

माझ्या मनातला कोपरा ....


खूप दिवसापासून बंद असलेली ..
मनाचे दार आज अलगद उघडले ...
खूप धूळ बसली होती भिंतीवर ..
हलकीशी फुंकर मारली कडी - कोंड्यावर ..!

हळूच आत डोकावले ..आणि
विचारले स्वतःलाच ...
आज पर्यंत काय काय गमावलेस ..
आणि किती कमावालेस ...!
दुनियेच्या या बाजारात ..
विकत तर घेतलं सगळं..
पण स्वतःला विकत घ्यायची ..
किंमत नाही परवडली ...??

एक पाऊल अजून थोडे पुढे टाकले ..
गेलो हळूच मनाच्या कोपऱ्यात ..
दबक्या पावलांनी ..!
माहित होते ..थोडा जरी आवाज केला ..
तर हरवेल सर्व काही ..
नाजूक मन माझं आज पडलंय एकाकी ..
पत्यांचा बंगलाच बांधलाय जणू ...
वापरून माझ्या आठवणींच्या भिंती ..!

आजूनही तसाच आहे ओलावा डोळ्यात ...
अन स्पर्शामध्ये गारवा ...
थरथरते हाताने घेतले मनाला कुशीत ...
प्रेमाने विचारले त्याला ..
कुठे दुखतंय-खुपतंय का रे काही...
त्यालाही खूप मोकळे वाटले ...
अन मग समजले ...
कित्तीशी दु:ख त्याने ...
आपल्या पोटात अशीच लपवलीत...!

खूप वाईट वाटले मला मनाबद्दल ..
आता वचन दिले त्याला ..
नाही बनू देणार त्याला ..
परत आठवणींचा पिंजरा ...
किती हि येऊ देत डोंगर दु:खाचे ..
एकटाच समोरा जायील दु:खाच्या लाटांना ..
पण ..
सतत हसरा ठेवील माझ्या मनातला कोपरा ..!


सनी ..एक वेडा मुलगा ...!

मला आता पोझीटीव थिंकिंग करायचंय ..


मला आता पोझीटीव थिंकिंग करायचंय ..
आणि हसत हसत -खेळत खेळत जगायचंय ..
उरलेले आयुष्य मला आनंदित करायचंय..
जीवनातील प्रत्येक क्षण मला अनुभवाचाय....!
मनाचा प्रत्येक हट्ट मला पुरवयाचाय ...
आणि म्हणूनच आज मी ठरवलंय ..
आजपासून हसत -खेळत जगायचंय ...!

मनातील कल्पनांना ज्वलंत रूप द्यायचंय ..
अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवायचंय ..
आयुष्याच्या लोखंडावरून परीस फिरवायचयं..
त्यासाठीच फक्त ..
मला हसत -खेळत जगायचंय...!

येणाऱ्या काळात फिनिक्स पक्षासारखी ..
झेप घेऊन नव्या उमेदीने उभं राहिचय ..
अश्रुनी नाही तर आनंदअश्रुनी भिजायचयं...
हरवलेल्या माझ्यातील " मी " ला परत आणायचयं....!

पाहिलेले सर्व स्वप्न मला सत्यात आलेलं पाहिचयं..
त्यासाठी वेळ आली तर लढायला सामोर जायचंय ..
पण आता काही झाले तरी मागं नाही पाहिचंय ...
म्हणून ..आजपासून ..
मला हसत -खेळत जगायचंय...!


सनी ...एक वेडा मुलगा