Wednesday, August 3, 2011

तू गेल्यापासून ......!

तू गेल्यापासून आपल्या अंगणात...
पहिल्यासारखा मुसळधार ..
पाऊस नाही ग कोसळत ..!

कारण ..
त्याला हि समजलेय कि ..
तू नाहीयेस आता या घरात ..
पाहिलं कसं तू घरात ..
यायच्या अगोदर ..
तो धुंवाधार कोसळायचा ..
आणि
तुला चिंब चिंब भिजवायचा ..

अगदी मनसोक्त ....!
आता तो येतो फक्त ..
काळेभोर ढग आणि ..
विजांचा कडकडाट घेऊन ..
अगदी रागावून ..
बहुतेक ..तुलाच हाक मारत असावा ..!
माझ्यासारखाच त्यालाही ....

तुझा विरह सहन होत नाही म्हणून ..!

कदाचित ..माझ्या इतकंच तुझ्यावर
त्या पावसाचं देखील प्रेम होतं...
हे आजकाल मला प्रत्येक ..
पावसाळ्यात पटायला लागलंय ..!


सांगतेस का मला... ?

सांगतेस का मला ?
प्रत्येक मौसमा सोबत भावना का ग बदलतात ..
मुसळधार पावसामध्ये भिजताना
जुन्या आठवणी पुन्हा का जाग्या होतात ?

ज्याची मला गरज असते ..
तीच माझी नसते ..आणि
जे मला नको असते ..
तेच समोर हजर असते ...?

सांगतेस का मला ...
तुझा विचार केला नाही तरी तूच स्वप्नात येतेस ..
माहित आहे कि तू माझी नाहीस ..
तरीही तू माझीच असल्याचे भास का होतात ?

सांगतेस का मला ?
दूर घनदाट जंगलात काळोख्या अंधारात
किलबिलणाऱ्या पक्ष्यांच्या मंद स्वरात
अमावाश्येच्या रात्रीत पौर्णिमेच्या चांदण्यात
नभ उजळून गेल्याला चंद्राच्या प्रकाशात
फक्त तूच आणि तूच का दिसतेस ?

सांगतेस का मला ?
तुझ्या सर्व आठवणी इतर वेळी कुठे लपून जातात ..
आणि कविता करायला बसलो कि कुठून जाग्या होतात ..
किती हि समजावले कि कवितेत तुला येऊ द्याचे नाही ..
पण अवेक्त भावना वेक्त केल्याशिवाय राहत नाहीत ...!

कदाचित...

माझ्या या हृदयात आजूनहि तूच आहेस ,,
कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी ..
तुझेशिवाय माझे जगणे काय जगणे आहे ??

म्हणूनच सांगतो ...

झाले गेले विसरून पुन्हा परत ये ...!
माझा खांदा अजूनही तुझेसाठी रिकामाच आहे ...!




सनी ..एक वेडा मुलगा ..!

रात्री एकटीच फिरताना .......!

निराश्याच्या समुद्रात हेलकावणारी तुझी नाव
आशेच्या किनाऱ्यावर आणून सोडलीये मी
तिला कायमचं अस्तिव निर्माण करण्यासाठी
येईल जीवनात तुझ्या नक्कीच कुणीतरी ...!

आलीच माझी आठवण ..
आठवले थोडेशे दोघांनी घालवलेले क्षण
तर डोळे चुकवून रडून घे एकांतात कुठेतरी
विश्वास आहे मला तुझे डोळे नक्कीच पुसेल कुणीतरी ......!

पण आठव फक्त आपले आनंदाचे क्षण
आवर घाल दु:खाला फिरकून हि नको देऊस दाराशी
मग बघ गालावरचे तुझे हास्य पहाण्यासाठी
असेल जवळ तुझ्या फक्त तुझे कुणीतरी ......!

कधीतरी अशीच रात्री एकटीच फिरताना
जरा फक्त एकदा वर बघ आकाशात
चांदण्यात दिसेल मी एकटाच तुला..
तोपर्यंत चंद्रहि झाली असशील तू कुणाचीतरी .......!

अग.. माझा काय विचार करतेस ..
खर सांगू ... रात्री एकटा फिरताना
चांदण्यात शोधत फिरत असतो तुला मी
पण तू गेल्यापासुन चंद्रहि कधीच दिसलाच नाही...!

मी कायम तुझ्या सोबत असायचो ना ...
मी नसण्याचीही सवय घालुन देईल कुणीतरी
मी दूर गेलो असलो तरी ...
मी नसण्याचीही सवय लागेल तुला कधीतरी.....!

माझं काय ग ...
तू नाहीस माझ्यासोबत आता ..पण
तू नसण्याची सवय अजून झाली नाही ..
कितीही दूर गेलीस तरी ..अजूनही जवळ आहेस माझ्या ..
वेडं मन हे माझं तू सोडून गेलीस हेच मानत नाही ....!

सनी ..एक वेडा मुलगा



आठवणींची जुनी डायरी ......!

खूप दिवसापासून जपून ठेवलेली ..
आपल्या आठवणींची जुनी डायरी दिसली ..
उलट-सुलट करताना मात्र नेमकी ...
थरथरत्या माझ्या हातातून निसटली ....!

त्यात होते तेच मी दिलेलं ते जुनं..
गुलाबाचं फुल ...
गुलाबाचं देठ मात्र तुटला होता ..
डायरीत दबलेल्या ..
त्या फुलाप्रमाणेच माझे अश्रू मी दाबत उठलो ...
कितीही दाबले तरी ..
अश्रुनी मात्र वाट काढली ...!

सुकलेल्या पाकळ्या पाहून ...
आठवणींची तार मात्र तुटली ...!
नकळत आज तुझ्या नावाची हाकही काळजातून उठली ..
एकेकाळचे धारदार गुलाबाचे काटे हि
आज बोथट होऊन तुटली ...!

नाही जाणू शकलो मी जन्मोजन्मीची ..
मनामनांची गाठ एकेकी कशी सुटली.. ??
आपल्या गोड आठवणीची साद
अजूनही आहे मनी बसलेली ...
पण आजच कशी भविष्याच्या वाटेत
परत भूतकाळाने मान वर काढली ..!
नाही नाही म्हणाताने देखील ...
नेमकी आजच अश्रुनी मात्र वाट काढली ....!

सनी ,,एक वेडा मुलगा



फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन.....


मला आता पोझीटीव थिंकिंग करायचंय ..
आणि हसत हसत -खेळत खेळत जगायचंय ..
उरलेले आयुष्य मला आनंदित करायचंय..
जीवनातील प्रत्येक क्षण मला अनुभवाचाय....!
मनाचा प्रत्येक हट्ट मला पुरवयाचाय ...
आणि म्हणूनच आज मी ठरवलंय ..
आजपासून हसत -खेळत जगायचंय ...!

मनातील कल्पनांना ज्वलंत रूप द्यायचंय ..
अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवायचंय ..
आयुष्याच्या लोखंडावरून परीस फिरवायचयं..
त्यासाठीच फक्त ..
मला हसत -खेळत जगायचंय...!

येणाऱ्या काळात फिनिक्स पक्षासारखी ..
झेप घेऊन नव्या उमेदीने उभं राहिचय ..
अश्रुनी नाही तर आनंदअश्रुनी भिजायचयं...
हरवलेल्या माझ्यातील " मी " ला परत आणायचयं....!

पाहिलेले सर्व स्वप्न मला सत्यात आलेलं पाहिचयं..
त्यासाठी वेळ आली तर लढायला सामोर जायचंय ..
पण आता काही झाले तरी मागं नाही पाहिचंय ...
म्हणून ..आजपासून ..
मला हसत -खेळत जगायचंय...!

सनी ...एक वेडा मुलगा ..!

Monday, June 20, 2011

विसरायला हवे....!


आपण एक निर्णय घेऊ यात आज

दु:ख होईल पण नाही विलाज ..

आज आपणच तोडायला हवेत ..

आता सारी नाती सारे बंध ..

दूर करायला हवा हळव्या प्रीतीचा गंध ...!!

विसरायला हवे आता जुनी स्मृती

जुने नाते ..जुणे ऋणानुबंध ..!

अलगद सोडून टाकू हे

प्रेमाचे हे रेशमी धागे

वळून पाहिलाही आता काही ..

ठेवायचे नाही मागे ..!

आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे ..

भरलेले रंग आपणच पुसायचे .

घेतलेल्या आणाभाका ..

शेवटपर्यंत साथ देण्याचे स्वप्नं ..

गंगेच्या वाहत्या धारेत सोडायचे ..

अन पापण्यात अश्रू दडवून ..

फक्त जगासमोर हसायचे ...!

आपणच पाहिलेल्या स्वप्नांना ..

आपणच देऊ मुठ माती ...

या जन्मीचं राहिलेले प्रेम ..

राखून ठेऊ पुढच्या जन्मासाठी .....!


सनी ..एक वेडा मुलगा ....!

नसेन मी.....!


उद्या काय असेन मी ..नसेन मी

तरीही तुमच्यात मागे उरेन मी ..

कुणाच्या आठवणीत ..कुणाच्या शिव्यांत,

कुणाचा चांगला मित्र ..कुणाचा मानलेला दुश्मन

कुणाच्या हसण्यात ...

तर कधी कुणाच्या हसता हसता पाणावलेल्या डोळ्यांत..

अश्रू बनून मागे उरेन मी ..

उद्या काय असेन मी ..नसेन मी

तरीही तुमच्यामध्ये मागे उरेन मी ..

आठवणींचा एक थेंब बनून उरेन मी ...

थंड वारयाची एखादी झुळूक बनून स्पर्श करेन मी ...

ना उरेल देह ..ना उरेल काही ..

उरतील फक्त हि शब्दफुले ..!

ती वेचून ज्याचे मन मोहरले

त्यांच्या हास्यात दिसेन मी ..

त्यांचे समवेत हसेन मी ...

असेन मी नसेन मी

तरीही शब्दगंध बनून सगळीकडे दरवळेन मी

उद्या काय असेन मी ..नसेन मी

तरीही तुमच्यामध्ये मागे उरेन मी ..



सनी ..एक वेडा मुलगा

पझेसिव..............!


तुला सांगू एकदा काय झालं ..

माझ्या बागेतील गुलाबाची..

नुकतीच उमललेली ती अल्लड कळी

तक्रार करत होती ...

आपले गुलाबी गाल फुगवून

तुझ्याविषयी माझ्याकडे ...

सांगत होती ..

"तुझ्या त्या सखीने सर्वांनाच

फितुर केलेय ..अगदी वेड लावलंय....!

सर्वानाच ..अगदी तुझेसारखेच ...!

त्या फुलपाखरांनादेखील...!

कारण..

तुझ्याप्रमाणे आम्हा फुलांना सोडून

ती वेडी फुलपाखरेदेखील

तुझ्याच प्रियेभोवती,

फिरत असतात दिवसभर ....!

अगदी उत्कंठेने बघत असतात

तिचं मोहक हास्य ..तिचं सौंदर्य ..

अतुर होतात ..तिच्या रेशमी स्पर्शासाठी,

तिच्या मधाळ सौंदर्याला टिपण्यासाठी.....! "

अगदी हृदयापासून ..

एक विचारू तुला ..

सांगशील ....?

यात दोष कुणाचा ग ..?

त्या वेड्या फुलपाखरांचा ..

त्या पझेसिव गुलाबी कळीचा ..

माझ्या नाजूक मनाचा ....

कि तुझ्या लोभस सौंदर्याचा .....?


सनी...एक वेडा मुलगा

Saturday, June 11, 2011

माझ्या नविन आयुष्यात.......!

मी करत होतो प्रेम
तेव्हा भाव खात होतीस ,
माझेकडे बघत हि नव्हतीस ..
तू आणि तुझ्या मैत्रिणी
यातच दंग होतीस पण ..
निघून गेल्यावर मात्र आता
आठवणी जपत बसलीस .

तुझ्या एका हाकेवर
मी आली असतो धावून,
एकदा तरी हाक ..
मारायची होती पाहून ..
अखेर मीच थकलो रे
तुझी वाट पाहून.

तू तर त्यावेळी माझी
पर्वा ही नाही केलीस,
माझ्या मनाची अवस्थाही
कधीच नाही जाणलीस.

माझ्या जबाबदारीचं ओझं
तुला घ्यायचं नव्हतं,
मी तरी रे काय करु मला
लग्नाचं नातं हवं होतं.
आयुष्यभर सोबत राहणार ..
हक्काचं माणूस मला हवं होतं ....


माझ्या आयुष्याचा मार्ग
मीच मग निवडला,
आई बाबांनी शोधलेली मुलगी
जोडीदारीन म्हणून स्वीकारली

माझ्यावरचं प्रेम बहुतेक
आता तुला जाणवतंय,
पण खुप उशीर झालाय
हेच तुला मला सांगायचंय.

मी नाही जपणार तुझ्या
कुठल्याच आठवणी भविष्यात,
कारण मी खुश आहे आता
माझ्या नविन आयुष्यात.......!


सनी ...एक वेडा मुलगा

सासरी जाताना ...!


एकदा तिनं सहज प्रश्न केला ..
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं..?
मलाही पटलं काय चुकतंय तिचं ..
खरा तेच बोलतेय ना ..?

आपली माणसं सोडून तीनेच का जायचं..?
परक घर आपलं का मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव लावायची ..?

पण नंतर समजावले तिला
अगं वेडे..
हा तर सृष्टीचा नियम आहे
सुंदर नदी ..शांत.. खेड्यातून ...
रानावनातून वाहणारी ..खेड्याची लाडकी पोर ..
ती नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून.....!

तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून..
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळतेच ना ..?
आपलं सार जुन अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते.....!

एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही विसरते आपले अस्तित्व ..
तीही सागरच तर होते..
विशाल ..अद्भुत ..
आणि म्हणूनच तिच्याचपुढे ...
नेहमी नतमस्तक होतात ना लोकं..!
आणि आपली पापं धुवायला ....
समुद्रात नाही गंगेतच जातात ..
ना लोकं .....?