Monday, June 20, 2011

पझेसिव..............!


तुला सांगू एकदा काय झालं ..

माझ्या बागेतील गुलाबाची..

नुकतीच उमललेली ती अल्लड कळी

तक्रार करत होती ...

आपले गुलाबी गाल फुगवून

तुझ्याविषयी माझ्याकडे ...

सांगत होती ..

"तुझ्या त्या सखीने सर्वांनाच

फितुर केलेय ..अगदी वेड लावलंय....!

सर्वानाच ..अगदी तुझेसारखेच ...!

त्या फुलपाखरांनादेखील...!

कारण..

तुझ्याप्रमाणे आम्हा फुलांना सोडून

ती वेडी फुलपाखरेदेखील

तुझ्याच प्रियेभोवती,

फिरत असतात दिवसभर ....!

अगदी उत्कंठेने बघत असतात

तिचं मोहक हास्य ..तिचं सौंदर्य ..

अतुर होतात ..तिच्या रेशमी स्पर्शासाठी,

तिच्या मधाळ सौंदर्याला टिपण्यासाठी.....! "

अगदी हृदयापासून ..

एक विचारू तुला ..

सांगशील ....?

यात दोष कुणाचा ग ..?

त्या वेड्या फुलपाखरांचा ..

त्या पझेसिव गुलाबी कळीचा ..

माझ्या नाजूक मनाचा ....

कि तुझ्या लोभस सौंदर्याचा .....?


सनी...एक वेडा मुलगा

No comments:

Post a Comment