Saturday, June 11, 2011

सासरी जाताना ...!


एकदा तिनं सहज प्रश्न केला ..
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं..?
मलाही पटलं काय चुकतंय तिचं ..
खरा तेच बोलतेय ना ..?

आपली माणसं सोडून तीनेच का जायचं..?
परक घर आपलं का मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव लावायची ..?

पण नंतर समजावले तिला
अगं वेडे..
हा तर सृष्टीचा नियम आहे
सुंदर नदी ..शांत.. खेड्यातून ...
रानावनातून वाहणारी ..खेड्याची लाडकी पोर ..
ती नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून.....!

तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून..
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळतेच ना ..?
आपलं सार जुन अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते.....!

एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही विसरते आपले अस्तित्व ..
तीही सागरच तर होते..
विशाल ..अद्भुत ..
आणि म्हणूनच तिच्याचपुढे ...
नेहमी नतमस्तक होतात ना लोकं..!
आणि आपली पापं धुवायला ....
समुद्रात नाही गंगेतच जातात ..
ना लोकं .....?

No comments:

Post a Comment