Sunday, May 29, 2011

छानसे स्वप्नं ............!


काल मी एक छानसे स्वप्नं पाहिलं..
माझं स्वतःच चिमुकलं घर ..
त्या घरात मस्त एक दिवाणखाना ..
त्या दिवाणखान्याच्या शुभ्र भिंतीवर ..
लावलेली एक काचेची फ्रेम .. पण रिकामी
विचार केला काय बर लावावे ..त्या फ्रेम मध्ये ..

लावावा एखादा फोटो भारताला महासत्तेची स्वप्नं..
दाखवणाऱ्या एखाद्या उमद्या वेक्तीचा ...
कि लावावा आजच्या राजकारण्याचा ?
पण नकोच ...!
त्यांची लायकीच नाही .....
लावावा तेथे फोटो....स्वतंत्र भारतात-
आत्महत्या कराव्या लागलेल्या
एका कर्जबाजारी शेतकऱ्याचा ..?

कधीतरी त्यात लावता येईल फोटो.....
स्री-भ्रूणहत्त्येत सामील एखाद्या वर वर मुलीचे
गोडवे गाणाऱ्या एखाद्या उच्चशिक्षित पांढरपेशा
नालायक माणसाचा ...!.
अथवा.....
माणूसकीला काळीमा फासून......
गरीब माणसाच्या किडनी सारख्या
अवयवांची तस्करी करणा-या अन मुलगा कि मुलगी
आहे हे पैसे घेऊन सांगणाऱ्या क्रुर डॉक्टरचा ...!

या फ्रेम मधे रंग भरीन म्हणतो.....
गद्दार देशद्रोहींच्या रक्ताचा....!
कसाब सारख्या लोकांचा पाहुणचार करणाऱ्या
अन आमची सहनशक्ती पाहणाऱ्या कठोर सरकारचा ...!
भ्रष्ट्राचारात बुडलेल्या ..भूखंड हडपणाऱ्या नेत्यांचा ...!

पण मी सर्व सामान्य गरीब माणूस ..फार तर ..
फोटो लावील एखाद्या देव-देवतेचा आणि प्रार्थना
करील कि .. हे देवा या लोकांच्या हातून सत्कार्य घडू दे ..
चांगले विचार येऊ दे त्यांच्या मनात ..
आणि त्यांना माणुसकीची जाणीव असू दे ....!!
दुसराहि आपल्यासारखा माणूसच आहे ..हे समजू दे ....!!


सनी... एक वेडा मुलगा..!

1 comment:

  1. सुरुवात अगदी स्वप्नात घेउन गेली.. पण पुढे कविता खुपच different twist घेते ....
    शेवट मात्र सुखावून गेला.. खरच शेवटी देवाशिवाय आपल्या कड़े काही पर्याय आहे का ? :)

    ReplyDelete