Tuesday, March 15, 2011

काय किंमत आहे ...........!!!


श्वास होता श्वासात तेव्हा
नव्हतं कोणी डोकावून बघायला
आज जेव्हा श्वासाच उरला नाही
तेव्हा आले सगळे बघायला .....!

नव्हतं कुणी रडायला माझेबरोबर ..
तेव्हा नव्हतं कुणी हसायला ..
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन ..
तर , आले सगळे टाहो फोडायला ....!

आज पहा माझा काय  थाट.!
लोक जमतील मला अंघोळ घालायला
आयुष्यभर कधी नाही  पाहिलं कापड
आज नवीन पांढरे शुभ्र वस्र मला नेसायला ...!

जेव्हा उपाशी होतो रात्रो रात्र ..
नव्हतं कोणी एक घास खाऊ घालायला ..
आज जेव्हा भूक मेली माझ्याच बरोबर माझी ..
ठेवलाय माझेसाठी त्यांनी भात शिजायला .....

जन्मभर लाथ मारून गेले ते मला
आज आले माझ्या पाया पडायला
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी ..
आज चौघे चौघे  आले मला धरायला ..!

आज काय किंमत त्या रडण्याला ..?
आज काय किंमत त्या छाताड झोडण्याला..?
ज्या घरात राहातच नाही आज कोणी ..
काय किंमत आहे "ती " घरपुजा करण्याला ..?
काय किंमत आहे "ती " घरपुजा करण्याला ..?



sangrahit By My Friend : Saajan Uchade

2 comments:

  1. नव्हतं कुणी रडायला माझेबरोबर ..
    तेव्हा नव्हतं कुणी हसायला ..
    आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन ..
    तर , आले सगळे टाहो फोडायला ....!

    khup touchy aahe hi line....jagachi ritach nyari aahe.
    te mahnatat na....
    ayushybhar jalalya nantar,
    melyavar hi jalatat
    lakadapeksha mansech
    lakdacha gundharm palatat.

    ReplyDelete
  2. आभारी आहे सनी, अपर्णा तुम्ही माझ्या कवितेला दाद दिल्या बद्दल.....
    ही कविता माझी आहे...
    ३० जुलै २००८ ला प्रथमच मी ही कविता काव्यांजली या orkut community वर पोस्ट केली.....
    माझ्या कवितेला भर भरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे......

    ReplyDelete