Monday, November 14, 2011

एक अलिखित करार करू या ...!

चल... या दिवाळीपासून ..
आपण एक अलिखित करार करू या ...
सर्व काही वाटून घेऊयात ...
गुलाबी थंड पहाट तुला घे ...
रणरणत्या उन्हाच्या झळा मला दे ..!

बागेतील रंगबेरंगी गुलाब हातात तुझ्या ..
टोकदार काटे.. वाटेत माझ्या ...
ओठावर तुझ्या स्मित हास्य खेळावं ..
खारं पाणी माझ्या डोळ्यातच राहावं ...!

भिजेतेस आनंदाने त्या रिमझिम धारा तुला ..
मोठ्या इमारती हि वाहून नेणारा पूर राहूदे मला ..
येशाचे हर एक चढ तू चढावा ..
चढा नंतरचा उतार माझ्या वाट्याला यावा ....!

सुखाचे सर्व अश्रू तुझ्या डोळ्यात यावे ..
आणि दु:खाचे अश्रू मला मिळावे ..
जीवनाच्या वाटेवरील दूरचा रस्ता माझा ..
त्याच रस्त्यावरील एकाच विसावा तुझा ...!

तुझ्या साठी ते ओलेचिंब पावसाळे ..
जन्मभर मला असू दे उन्हाळे ..
काळोख चिरणारा दिवा तुझ्याच घरात ..
अन मी राहावं जन्मभर अंधारात ....!


सनी ..एक वेडा मुलगा ...!

No comments:

Post a Comment