Saturday, April 30, 2011

माझे एवढे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन गेलात .

बाबा लोक सोन्याचा चमचा तोंडात
घेऊन जन्माला येतात ..
इथे मात्र तुम्ही चमच्यापासून ..
संसार उभा केलात ...!

बाबा तुमच्या मित्रांकडे ..
सुख पायदळी लोळत होते ..
पण तुम्ही मात्र ..
शून्यातून विश्व निर्माण केले .. !

हाती घेतलेले काम
पूर्ण करावे असे सांगणारे तुम्ही ..
आम्हाला मात्र अर्ध्या
प्रवासात सोडून गेलात ..?

जन्मभर थोरामोठ्याना
आधारस्तंभ वाटलात ..
पण तुमच्या लाडक्या चिमण्यांना ..
मात्र निराधार करून गेलात ...?

जन्मभर जिद्दीने जगलात तुम्ही
पण त्या मृत्युपुढे मात्र हात टेकवले ...!

आपल्या लाडक्या मुलांसाठी कष्ट
उपसत राहिलात आयुष्यभर
त्यांचे सुख अनुभवायला ....
का नाही थांबलात हो बाबा ....!

खाच खळग्यातून अवघड वळणावरून
आम्हाला सर्वाना घेऊन पुढे आलात
पायवाट सोपी दिसू लागताच
मागे काहो वळलात ..?

कष्टापासून एकदम दूर ठेवणार
होता ना हो बाबा आम्हाला ..?
मग या कोवळ्या खांद्यांना तुम्हाला
उचलायाचे कष्ट का हो दिले ....?

माझे एवढे प्रश्न अनुत्तरीत त ठेऊन गेलात ..
शेवटी एका प्रश्नाच उत्तर द्या मला बाबा ..
तुम्ही एवढे चांगले का होता ?
कि त्या ईश्वरालाही आवडलात ........!!



सनी ..एक वेडा मुलगा ...!

1 comment:

  1. touching...
    speechless..
    एक कविता म्हणून तर ही छान आहेच, यात वाद नाहीच..
    पण बाबाना ही तुझ्या कर्तृत्वावर विश्वास असणार... दुःख देव त्यानाच देतो जे ते समर्थपणे पेलू शकतात.. तुला अनेक शुभेच्छा ....

    ReplyDelete