Monday, September 5, 2011

माझ्या मनातला कोपरा ....


खूप दिवसापासून बंद असलेली ..
मनाचे दार आज अलगद उघडले ...
खूप धूळ बसली होती भिंतीवर ..
हलकीशी फुंकर मारली कडी - कोंड्यावर ..!

हळूच आत डोकावले ..आणि
विचारले स्वतःलाच ...
आज पर्यंत काय काय गमावलेस ..
आणि किती कमावालेस ...!
दुनियेच्या या बाजारात ..
विकत तर घेतलं सगळं..
पण स्वतःला विकत घ्यायची ..
किंमत नाही परवडली ...??

एक पाऊल अजून थोडे पुढे टाकले ..
गेलो हळूच मनाच्या कोपऱ्यात ..
दबक्या पावलांनी ..!
माहित होते ..थोडा जरी आवाज केला ..
तर हरवेल सर्व काही ..
नाजूक मन माझं आज पडलंय एकाकी ..
पत्यांचा बंगलाच बांधलाय जणू ...
वापरून माझ्या आठवणींच्या भिंती ..!

आजूनही तसाच आहे ओलावा डोळ्यात ...
अन स्पर्शामध्ये गारवा ...
थरथरते हाताने घेतले मनाला कुशीत ...
प्रेमाने विचारले त्याला ..
कुठे दुखतंय-खुपतंय का रे काही...
त्यालाही खूप मोकळे वाटले ...
अन मग समजले ...
कित्तीशी दु:ख त्याने ...
आपल्या पोटात अशीच लपवलीत...!

खूप वाईट वाटले मला मनाबद्दल ..
आता वचन दिले त्याला ..
नाही बनू देणार त्याला ..
परत आठवणींचा पिंजरा ...
किती हि येऊ देत डोंगर दु:खाचे ..
एकटाच समोरा जायील दु:खाच्या लाटांना ..
पण ..
सतत हसरा ठेवील माझ्या मनातला कोपरा ..!


सनी ..एक वेडा मुलगा ...!

No comments:

Post a Comment