Monday, September 5, 2011

पुन्हा एकदा देवा मला लहानपण दे ..


पुन्हा एकदा देवा मला लहानपण दे ..

तोच बसायचा कट्टा अन तीच जुनी शाळा
शेतातली पाऊल वाट अन तोच मित्रांचा मेळा
थंडगार झरयातले खळाळणारे पाणी ...
पाणी उडवत चालायचे तसेच आनवाणी...!

अण्याने फेकलेली विट्टी ..पिन्याने मारलेला फटका ..
बोरे काढता काढता लागलेला उन्हाचा चटका ..
भाऊमाळ्याने पकडलेली पेरूची पिशवी ...!
मास्तर ने टेबलावर उभे केलेले रम्या आणि तुळशी

पळण्याची शर्यत अन मित्रांची फसगत ..
अर्ध्यातून शाळेतून पळून जाण्याची गम्मत ..!
राणी आणि पक्याचे भांडण ..आम्ही राणीची बाजू घेणं ..
पक्याचा आमच्याशी अबोला आणि चार दिवस शाळेत न येणं..

पी.टी. चे शिंदे सर आणि त्यांच्या कवायती
त्यांना टाळण्यासाठी मग अफलातून युक्ती ..
दुसऱ्यादिवशी सकाळी मग छडीचा मार ..
त्यानंतर एकतास पक्या हात दाबून दाबून बेजार ..!

तिचा तो चोरून पाठलाग अन मागे बघून तिचं हसणं ..
पृथ्वीवर जणू उतरलं त्यादिवशी चंद्राचं चांदणं ...
तिच्या अबोल डोळ्यात दिसायची मला प्रेमाची खुण ..
कुठेच काही नाही तरी मित्रांची पार्टीसाठी भुणभुण ...!

आजही आठवतात ते गोड दिवस त्या गोड आठवणी
नकळत सर्व आठवल्यावर डोळ्यात भरून येतं पाणी
कधी कधी वाटते पुन्हा एकदा लहान व्हावे
कधी हि न संपणाऱ्या स्वप्नात रमून जावे ...!

परत एकदा देवा मला माझे लहानपण दे ..
साथ मित्रांची असो आणि सहवास तीचा दे ...!

सनी ..एक वेडा मुलगा ...!

No comments:

Post a Comment