Tuesday, September 27, 2011

माझी दीदी ..एकदम साधी ..


माझी दीदी ..एकदम साधी ..
शाळेत जाताना .. मला बोटाला धरून नेणारी ..
लंच ब्रेक मध्ये ..तिचे जेवण सोडून ..
धावत पळत येऊन माझ्या डब्याची चौकशी करणारी ...
शाळा सुटल्यावर परत हात धरून घरी आणणारी ...!

मला आठवतय...
अर्धि जास्तीची पोळी.. माझ्या ताटात वाढणारी ...
स्वतःच्या हाताने पोळीचा घास भरवणारी ...
अन..तिच्या खरेदीच्या आधी माझी खरेदी करणारी ..
नेहमी माझ्या चुका समजून घेणारी..
आणि कायम मला पाठीशी घालणारी ...!

माझी दीदी तशी एकदम साधीच ..
आईचे छत्र हरवल्यानंतर ..
आईची माया देणारी ..
कधीही अंतर न देणारी ..
आईची उणीव कधीही जाणवू न देणारी ..!

माझी दीदी एकदम प्रेमळ ..
थोडीशी शांत ..पण गोड हसणारी ..
खूप विचारपूर्वक निर्णय घेणारी ..
ती बरोबर असली कि ..वाटतं ..
या विशाल वटावृक्षाखाली छोटेसे रोपटं
त्याच्या पारंब्या धरून वाढतय ....!

वयाने पण फार मोठी नाहीये ती ..
पण अनुभवाने आभाळ व्यापलाय तिने ..
मित्र हि तीच ..
मैत्रीण हि तीच ..
माझी सखी हि तीच ..
मार्गदर्शक हि तीच ..
माझा आदर्श हि तिच ...!

तिचे हास्य बघायचेय तुम्हाला ..
मग फक्त मला हसताना बघा ..
कशी मनमोकळे हसते ती ...
तिच्या या हास्यासाठी तर मी आज हसतोय ..
मी नेहमी हसरा असू दे ..
असं रोज देवाकडे मागतोय ....!

खूप छान आहे हो माझी दीदी ..
पण एक दिवस जाईल सोडून मला ...
आपल्या सासरी ...
तेव्हा .............?

No comments:

Post a Comment