Sunday, February 27, 2011

मी बदलतोय .........!!


हो..तुला हे  ऐकावेच लागेल ....
झालीस न शेवटी तयार ...
तर मग  ऐक ...
तू तिकडे कर्तव्यपूर्ती करत बसलीस ...
पण माझी अजिबात आठवण येत नाही ...
मी एवढे मेसेज आणि फोन करूनही तुला ..
तुला मला त्याचा रिप्लाय द्यावासा वाटत नाही .....

तुझा स्वभाव ...
तुझ्या महत्वाकांक्षा ...
पण माझं काय ??
माझा विचार केलायस..?
तुझ्या इतका व्येवाहारिक नाही वागू शकत मी ...!!
जेव्हा त्यागाची किंमत शून्य ठरते ना ,
तेव्हा सोसण्यालाही अर्थ उरत नाही ....

दिवसागणिक माझं मन आतून पोकळ होत चाललंय  ...
तुझं प्रेमही माझ्या आयुष्याशी समांतर होत चाललंय ..
पण माझ्यापर्यंत पोहचणार कधी ..??

अर्थात तुझ्यासमोर मी इतका लाचार तरी का होऊ...... ??

मी बदलतोय .... शांत शांत आहे ... गप्प झालोय ...!

हे कळत नाही का तुला... ??


सनी ..एक वेडा मुलगा .....!

कधी केला का प्रश्न या अन्यायाचा ..........??


आयुष्य सरत चाललंय .
ओल्या जखमा घेऊन ..
तीच अपमानाची दलदल
अन बदल्याची भावना घेऊन ...

तुझ्याच हातात आहे
स्वतःच्या अभिमानाचा लगाम
सुखलेल्या खपल्या
उकरणं किवा पुन्हा फुंकर घालून
सुकावणं  ...
तुझ्याच हातात आहे ......

अपमान चिघळत बसणं
नेहमीच कठीण जातं..
तो गिळून टाकावा
आणि सोडावा श्वास ...
निरागसतेचा ...

मी खरं सांगू ...
तुझं माझं काही जात नाही ..
इथे हरवतात ते फक्त क्षण
मला हवा असतो तुझा प्रेमळ सहवास
आणि सोबत ...तू सुद्धा ..

पण तुझ्यात असते ओढ
बदल्याची...
दिवस -रात्र  वेळ तुझ्या
खटल्यांची ...

कंटाळा आलाय आता मला
तुझ्या अस्तित्वाच्या धड्यांचा ..
मी शून्य होवून जगलोच ना ..
कधी केला का प्रश्न या अन्यायाचा ...??

मी स्वीकारत आलोय तुला ...
तुझ्या अहंकारा सहित ..
पण आज कळतंय ..
सर्व व्यर्थ जातंय ...
हाती काही नाही .......!!!

स्वतःला मात्र तू जपत जा.............!!

   जाते म्हणतेस हरकत नाही
   एवढे तरी करून जा....
   नाही अडवणार तुला मी जाताना
   चेहरा मात्र हसरा ठेवून जा.

    आजपर्यंत जी दंगा मस्ती केली
    सगळे तू विसरून जा.
    होते कोणी माझ्या  नावाचे
    तुझ्या आयुष्यात नावच ते पुसून जा....

    नाही फरक पडणार मला तुझ्या जाण्याने 
    जाताना  ओले डोळे  तुझे मात्र पुसून जा.  
    जमणार नही मला तुझ्या
    डोळ्यात माझ्यासाठी अश्रू  
    माझ्यासाठीच  ते..
    अश्रू शिलक ठेवून जा.  

    नको मिळाया आयुष्यात परत मला
     तुझ्यासारखी जीव लावणारी  
    एवढी शेवटची  प्राथर्ना
     माझ्यासाठी  तू करून जा.  

     तू कुठेही राहा सुखी राहा
     सुख माझे त्यात आहे 
     स्वतःला मात्र  तू जपत जा.............!!

sangrahit

Friday, February 25, 2011

तुला घरी जाऊ देईन...........!!



एकदा मला भेटायला
माझ्या घरी येशील का ...?
आणि केस मोकळे सोडून
माझ्या जवळ बसशील का....?

मी दोन्ही हातांमधे
तुझा चेहरा घेईन..
रेखीव गहिऱ्या डोळ्यांमधे
बघून हरवून जाईन....

मग तू विचार माझ्या राज़ा
असं रे  काय बघतो...?
मी म्हणेन बघतो कुठे वेडी ?
अगं पावसात भिजतो……

मग तू अलगद, तुझा रेखीव
पापण्या मिटून घेशील..
पाऊस ओसरल्यावरचं
निरभ्र आकाश होशील....

मग विचार किती वाजले ?
वेळ झाली का..?
मी म्हणेन हे ग काय राणी
मग तू आलीसच का...?

मग मला जवळ घेऊन
केसात हात फिरवून..
माझी समजून घाल ...
म्हण राजा सोडून जाताना
माझेही होतात हाल ...

मग मी तुला पुन्हा एकदा
डोळ्यात साठवून घेईन...
आणि एकदम शहाण्यासारखा
तुला घरी जाऊ देईन...........!!

सनी ...एक वेडा मुलगा

Thursday, February 24, 2011

मोगराच तो .........!!


मोगराच तो ....
त्याचा सुवास तर  दरवळणारच...
दरवळणारा गंध धुंदही करणारच ....
काय सुगंधी होते ते दिवस
त्या मोगरयाने नटलेली सुगंधी मी
अन् त्या सुगंधाने धुंद तू....!

रोज ऑफिस मधून येतांना..
आठवणीने रोज आणायाचास गजरा माझ्यासाठी
मला गंधीत करून स्वत धुंद होण्यासाठी .....

मग उगवल्या त्या काळ रात्री ...
ते कठीण दिवस..
तो त्रास...
ती परवड...
दोन जीवांची जाताना मी...
परत आले एकटीच  ...
एकटीच तनाने अन् मनाने हि खचलेली ...
तू वरवर गंभीर ....
पण आतून पार हललेला....

माझ्या त्या हरवलेल्या रुपाला बघून..
अस्वस्थपणे वावरणारा ...
त्या कठिण दिवसात मला सांभाळून  घेत
माझ्या लांब  सड़क वेणिचा झालेली
शेपटी बघून उसासे सोडणारा तू  ....

त्या दिवशी अचानक..
तू गजरा घेउन आलास....
आणि लक्षात आल्या बरोबर..
त्या गजरयाला खिशातच चुरगळुन टाकलास ...
पण मोगराच तो ..
बेईमान झालाच शेवटी ....
गंध तोच ...
पण धुंदी उतरवून गेला...

आजकाल तू गजरा आणत ही नाहीस
मी सुगंधी होत ही नाही ...
आणी तू पण धुंद होत नाही..
धुंद होत नाहीस....





sangrahit

Tuesday, February 22, 2011

पण ...माझे प्रेम खरे होते


वाट पाहताना , मन म्हणाले
जरा दोर घट्ट आवळ
सख्य नसले तरी
तुझ्या वेड्या प्रेमाला आवर.....

पण तू दिसताच सैरभैर  झाले हे मन
तू तर निघून गेलीस ..
सांग आता कशी करू सावरा सावर ...

तुझ्या सोबतचे ते क्षण काही औरच होते ..
कारण ते सुंदर पेक्षा सुंदर होते
तू गेल्यावर  स्वतःलाच विचारले ..
माझे एवढे काय चुकले होते ..
पण तरीही मनाला समाधान आहे
कारण माझे प्रेम खरे होते ....

दिलेल्या सुखापेक्षा गणती तू  केली ती दु:खाचीच
अर्ध्यावरती तू सोडलस ...
तेव्हा सांग चूक होती कुणाची ..?
मानले चूक तुझी ना माझी ...
पण पळवाट म्हणून कि काय ..
दोष शेवटी परिस्थितीच्या माथी ...

काहीच न झाल्या सारखे बोलयाचे ..
ते माझे शर्थीचे प्रयत्न होते ..
तुला काय माहित ..
त्यात माझ्या मनाची किती फरफट होते ...
तुला अधांतरी सोडण्याचे धाडस केले होते  ...
पण माझे मन माझ्यावरती किती रुसून बसले होते .......!!








सनी ..एक वेडा मुलगा..!!

I QUIT.......


काही तरी उणं असतं
काही तरी अधिक असतं
I QUIT ..म्हणण्या इतपत
मित्रा .....
आयुष्य का वाईट असतं ....?

दोरी आड अडकलेल्या ..
श्वासात सगळं संपतच असं नाही
बाबांचं बोट
आईची कूस
देवाचे घरी मिळतेच असं नाही ...

इच्छा आशा अन आकांक्षा
साऱ्या उराशी बाळगायला हवीत
नाही मिळालं काही
तरीही हसत ..
पुन्हा नवी स्वप्नं पाहायला हवीत ..

मित्रा....
I QUIT .. म्हणण्याआधी
मित्रांच्या मिठीत थोडसं रडून बघ
आयुष्य खरच सुंदर आहे
त्याला थोडसं जगुन बघ .....!!






Sangrahit

Sunday, February 20, 2011

तु माझेजवळ असतीस तर...........................!!



तु माझेजवळ असतीस  तर..
डोळे कधी भरले नसते
रुमालाचे धागे कधी
आसवांनी भिजले नसते
स्वतःचे डोळे पुसता पुसता

…………हात माझे थकले नसते.


तु माझेजवळ असतीस  तर..
गालावर फुललेले कमळ
अकाली कोमजले नसते
स्वप्ने पहायच्या वयात
जिथे गुलाब फुलायचे

………..तिथे काटे रुतले नसते.


तु माझेजवळ असतीस तर..
सजली असती मग निशीगंधाही
हसली  असती मग बागेतली
अबोल मुग्ध ती रातराणीही
कुंपणावरच्या जाई-जुईंनी

…………कुजबुजणे सोडले नसते.


तु माझेजवळ असतीस तर..
असले असते माझे असणेही
तुझ्या असण्यातले माझे
माझ्या असण्याला शोधणेही
भिरभिरणार्‍या पापणीने मग

………..क्षितिज शोधणे सोडले नसते.



सनी ...एक वेडा मुलगा

Friday, February 18, 2011

तू पुन्हा कधीच येवू नकोस ............!!

घायाळ मनाला आणखी घाव देऊ नकोस
तुझ्या स्वार्थाला प्रेमाचं नाव देऊ नकोस
तू पुन्हा कधीच येवू नकोस ..

घेतल्या होत्या शपथा किती
वचने किती राहू दे माझ्याकडे ,
परत आता घेऊ नकोस ..
तू पुन्हा कधीच येवू नकोस ..

आहेत जखमा आधिच इतक्या , त्यात
आता हृदयात आठवणींचे छाप ठेऊ नकोस
तू पुन्हा कधीच येवू नकोस ..

सारच तर तू घेऊन गेलीस माझं..
आता प्राण तेवढे हे माझे तू नेवू नकोस ..

तू पुन्हा कधी कधी येवू नकोस ...............!!


सनी ..एक वेडा मुलगा.......!!

Thursday, February 17, 2011

प्रश्नचिन्ह ............."(?)".....


एक भेटते अशी व्यक्ति....
तिच्याशी आपण मनसोक्त गप्पा मारतो,
तिच्याशी मनमोकळेपणाने सगळं बोलतो,
तिच्याशी भांडतो, खेळतो, ,रागावतो,
तर कधी चिडतो ही.., हक्क दाखवतो.....
आपलं मानतो...........
त्या व्यक्तीची साथ, संगत,
हवी हवीशी वाटते.........
पण........(?)

विसरतो आपण....
की याच "(?)" प्रश्नचिन्हाना
आयुष्यात खरं स्थान असतं......

हीच "(?)"  "एखाद्याची" आपल्या आयुष्यातील
जागा  स्थान ठरवतात...
त्याची जागा , स्थान "गमवतात" ही ......

तरीही.........
याच (?) प्रश्नचिन्हानानचा विचार केला जातो.........
आणि त्या हव्या-हव्याश्या वाटणार्या
व्यक्ति वरचा "हक्क".....
त्यांचा "आपलेपणा"........
त्यांच "प्रेम"..........
आपण कायमचं गमावून बसतो.........

केवळ आणि केवळ या "(?)"..........





सनी ..एक वेडा मुलगा ....!!

मन माझं ..........!!


वेडं मन हे असा का वागतं...?
कधी उगाच स्वैर विहारतं ..
कधी गुपचूप कोपऱ्यात रुसून बसतं..

कधी छोट्याशा गोष्टीनेही खूप आनंदतं
कधी मोठ्या दु: खातही स्थितप्रज्ञ राहतं ..

कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं
कधी व्येथेच्या सागरातही आनंदानं एकटच झुलत ..

कधी हवं ते मिळावं म्हणून टाहो फोडतं
कधी मिळवता न आल्याने उगाच झुरतं ...

कधी आठवणीन सोबत भविष्याचं चित्र रंगवत
कधी काही  कटू आठवणी आठवून उगाचच रडतं....

कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकड नेणारी सुंदर वाट..

कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा ..
कधी मन माझं.. आसवांचा पाऊस कोसळणारा ..

एक कोडं वाटे मन अगदी गहिरं गहिरं
कधी सारे ऐकूनही वागे बहिरं बहिरं ..

असा ग कसं मन माझं मलाच समजेना
मन कोणाच्या ग सारखं हे गुज उमजेना ...........!!


सनी... एक वेडा मुलगा .....!!

Tuesday, February 15, 2011

बेवफाई........


गजरा दुज्या कुणाचा ती वेणीत माळते आहे ..
कळल्यावर ती कळ काळजास जाळते आहे ..

बेवफाईचा वास तिच्या येतोय बोलण्याला
तिची आठवण त्याच वासात गंधाळते आहे ..

घेतल्या कित्तेक तिने बाहुपाशात आणाभाका
पण आता बोलणेही माझेशी टाळते आहे ...

मी आश्वस्त होतो  ,अस्वस्थ होत आहे ..
डोळ्यातले पाणी खारे पण ढाळते आहे ..

पुरून पुरावे पुरे ,प्रीतीचे पुराने माझ्या
नव्याशी नवी वचने, नव्याने पाळते आहे .....


सनी ..एक वेडा मुलगा .....!!

खरच असावं कुणीतरी…..


असावं कुणीतरी…तुझ्यामध्ये  मी हरवले म्हणणारी ....
असावं कुणीतरी…तुझ्यामध्ये  मी हरवले म्हणणारी ...

सकाळी साखर झोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माझी क्षणात झोप उडवणारी ….
असं असावं कुणीतरी…..

आणी केविलवाण्या  डोळ्यानी माझ्याकडे पाहत राहणारी…..
असावं कुणीतरी..मी जवळ नसताना माझ्यासोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..
असावं कुणीतरी….


माझा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारी ,
आणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी…..
असावं कुणीतरी….


भरलेच जर डोळे कधी माझे
तर ओल्या असवांना पुसनारी…..
असावं कुणीतरी..माझ्या मनात रमनारी,
अंधारलेल्या वाटेत माझ्या बरोबर येणारी…..
असावं कुणीतरी…..

उशीर झाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ……
असावं कुणीतरी…..खरच ..
असावं कुणीतरी…..तुझ्यामध्ये मी हरवले म्हणणारी


सनी ...एक वेडा मुलगा .......!!

सुखामागे धावता धावता.....................!!

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही मग माश्याची भागत नाही तहान ...

          स्वप्नं सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
           वाटी -वाटी ने ओतले तरी कमीच पडते तूप ..

बायको आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नका वेळ

            करिअर होतं जीवन मात्र जगायचे जमेना तंत्र
            बापाची ओळख मुलं सांगती पैसा छापायचं यंत्र

चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वतःच्याच घरी ..
दोन दिवस कौतुक होते नंतर डोकेदुखी सारी ..

             मुलंच मग विचारू लागतात बाबा अजून काहो घरी ..?
             त्यांचाही दोष नसतो त्यानाही सवयच नसते मुळी..

क्षणिक औदासिन्य येत मात्र पुन्हा सुरु होतं चक्र ..
करिअर करिअर दळता दळता स्वास्थ्य होतं वक्र ..

             सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या
             आतून मात्र मातीच्या भिंती कधी हि न सारवलेल्या ..

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणू लागतं काही
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही ...

               सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं
               सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं ...





सनी ....एक वेडा मुलगा .

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात.....

आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
कधी मेसेस मधून तर कधी इमेल मधून...
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात...

एकमेकांची खबर ठेवणे आजही त्यांनी सोडलेले नाही,
समोरच्याला इग्नोर करणं आजही त्यांना जमलेलं नाही..
जरा काही खट्टा झाला कि एकमेकांची काळजी करत बसतात....जेव्हा
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....................

पण आता पुर्वीसारख उठ सुठ ते एकमेकांना फोन करत नाहीत,
जर फोन केलाच कोणी तर काय बोलयाच हे दोघानाही सुचत नाही..
मग फोन वर उगाचच ते शब्दांशी खेळत बसतात...जेव्हा
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात....................

त्या दोघांना वेगळ होऊन बरेच महिने झालेत..
आता ते फक्त चांगले मित्र म्हणून राहिलेत..
तरीही कधी कधी जुन्या आठवणी मना मध्ये हळूच डोकावतात... जेव्हा ..
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात

ती टेन्शन मध्ये असली कि तिचा पहिला फोन त्यालाच असतो..
तोही सगळी कामे बाजूला सारून तिच्यासाठी हाजीर राहतो..
कारण त्याला माहित असत..
फार काही झाल्याशीवाय तिचा आवाज कातर नसतो...
त्याच्या इतकं जवळच अजूनही तीच कोणीच नसत ..
मग जोडी दाराच्या नकळत ते एकमेकांना भेटतात....जेव्हा
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात......


ती जेव्हा आनंदी असते तेव्हा त्याचीच आठवण येते ..
जेव्हा तिला मनातले  काही सांगायचे असतं..तेव्हा त्याचीच आठवण येते
जेव्हा तिला कुणी दुखावलं असतं..तेव्हा त्याचीच आठवण येते
सगळी बंधने झुगारून  घेतलेल्या शपथा तोडून
उठून मग त्यालाच फोन लावते ...
असेच बोलून मग एकमेकांची समजूत घालतात ..जेव्हा
आज हि  ते कधीकधी एकमेकांशी बोलतात..

त्यालाही जेव्हा तिची गरज असते ..
तेव्हा ती न बोलताही त्याच्या पाठीशी उभी असते ..
जेव्हा त्याला धीराची गरज असते ..
त्यालाही तेव्हा मग तिचीच आठवण येते ..
तीही  त्याचे साठी तेव्हा त्याचे पाठीवरून हात फिरवते ....
जुन्या आठवणी मग एकमेकांच्या नजरेत शोधतात ..जेव्हा
आज हि  ते कधीकधी एकमेकांशी बोलतात..


त्याच्या साठी कधी कधी ती हि कासावीस होते...
विसर विसर म्हणता म्हणता त्याचीच होऊन राहते..
पण तिच्या भावना ती शब्दात कधीच मांडत नाही..
आणि तो हि बोलताना तिच्या डोळ्यात कधीच बघत नाही..
अस न बोलताच ते एकमेकांना खूप समजून घेतात.. जेव्हा
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात.....


सनी ..एक वेडा मुलगा 

येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये ....................!!

पुन्हा एकदा परत ये ,

पुन्हा एकदा परत ये ,
आणि येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये ,

जर कधी आठवण आलीच माझी ,
तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये ,

त्रास होयील मला थोडा या उचकीचा ,
पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये ,

कदाचित जमणार नसेल हि तुला आता पुंन्हा येण ,
पण सोबत पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करायला फक्त एकदाच ये ,

सोबत मिळाली आहे तुलाही तुझ्या नवीन संसाराची ,
पण असेलच ना माझ्याकरिता पण देवाने सातजन्मांसाठी बांधलेली कुणी ...

जरी बांधलो गेलो असलो आपण सातजन्मांसाठी
तरी आठवा  जन्म  घेऊन फक्त माझ्यासाठीच ये ..

कदाचित म्हणशील हि पुन्हा मला अजून हि तू वेडाच आहेस,
पण अर्धवट आहे प्रेम अजून आपल ,ते पूर्ण करायला फक्त एकदाच ये...



anknown

बाबा तुम्ही गेल्यावर ....................!!

लोक म्हणतात , "मूलगा-
अगदी बापावर गेलाय,
बिचारा पोर तो ....
बापाविना वाढलाय."

खरच का हो बाबा,
मी तुमच्या सारखा दिसतो ?
तुमच्या विना खरच मी,
बिचारा का हो वाटतो ..?

तुमच्याकडून  शिकण्यासारखं-
बरंच काहीं होतं...
ते  समजण्याइतकं माझं..
वय मात्र नव्हतं.

आईच्या नजरेत-
तुमचीच मूर्ती दिसते,
तुम्हाला येवुन बिलगावं,
ईच्छा सतत होते...

कित्येक लोक तुमची-
अजुनही आठवण करतात,
तुम्ही केलेल्या उपकारांची
जाण ते ठेवतात...

बाबा तुम्ही गेल्यावर
इथं सगळच बदललंय
आपल्याच लोकांनी
आता दार बंद केलय...

ज्या माणसांना तुम्ही-
सुखी  जग दिलं..
तुमच्या लेकरांना त्यांनी-
आता वाऱ्यावर सोडलय.

बाबा तुमचं हे  पोरं
तूमच्या सारखंच होईल...,
पून्हा एकदा शून्यातून
विश्व निर्माण करील...

बाबा तूमचा आदर्श
डोळ्यांपूढे ठेवलाय
तूमच्या पाऊल खुणांवर -
मी पाय ठेवलाय.

बाबा मला तुमच्याशी
खूप-खूप बोलायचंय..
एकादातरी तुम्हाला
डोळे भरून पहायंचय...

एकदातरी बाबा
माझ्या स्वप्नात या,
अन एकदातरी बाबा
मला मीठीत घ्या ...................!!!






सनी .......!!

माणसाने समुद्र होण्यापेक्षा व्हावे किनारा..........!!

माणसाने समुद्र होण्यापेक्षा व्हावे किनारा..........!!

लाटेसारखे  येणारे प्रत्येक दुखः घट्ट पाय रोऊन झेलणारा....

किनारयाला नसतातच कुणी मित्र वा वैरीही

त्याच्या नशीबात असतात फ़क्त लाटा अन....

दर लाटेसोबत मिळणारा नविन आघात ऊघडतो अनुभवाच्या नविन वाटा...

त्यातली एखादी लाट असते हळुवारपणे येणारी.....

अलगद्पणे किनरयाला त्याची व्यथा विचारणारी..

पण त्या लाटेत गुंतायचे नसते किनारयाने

कारण क्षणात  त्याची स्वप्ने भंगतात  एका नविन आघाताने...

म्हणुनच म्हणतो समुद्र होण्यापेक्षा  व्हावे किनारा

शेवटी तोच असतो सोबती दु:ख प्रत्येक लाटेचे सामाऊन घेणारा...........!!


 सनी ....

Monday, February 14, 2011

काय माहीत कशी असेल ती .......... !!!!!

सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,
कारण नसताना खोटीच रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती ...!

एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटी असेल ती,
संसार कसा संभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती ....!

फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती ..... !

थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक  समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती...... !

एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दु:खात ही न तुटता हसेल का ती,
काय माहीत कशी असेल ती .......... !!!!!



sangrahit

बघ... राखेचा एक कण तुझ्या हातावर राहिल..

प्रेमात तुझ्या मिळाले मला जे एकटेपण
त्याचा कस माझा विझता श्वास
शेवटच्या या वळनावर आता प्रिये
शेवटची पुन्हा तुझीच आस ......

एकदा तुझा हात हातात धरून
निशब्द उभे रहायचं आहे...
उमजुन घे..
नाहीतर तुझा हात तूच पकड़ स्वतः
असेल तुझाच पण माझा समजुन घे

दोन्ही हात जोडून प्रार्थना कर
म्हण देवा याचे ह्रदय चिरून टाक
असेल जर त्याची थोडी कदर तर
आजच त्याला मारून टाक....

मी मेल्यावर मग अर्थीजवळ उभी रहा
अणि स्तब्ध नयनांनी सगळ पहा ...
आसवांना मात्र स्पष्टपणे सांग घोळ घालायचा नाही
तो मेला आहे...
त्याचा हट्ट धरायचा नाही .....

आग विझल्यावर मग थोडी जवळ जा
कुठे वाचलो का मी एकदा निरखून पहा
स्वतःला सांग व्हायच ते होउन गेलं
वेड्याचं आयुष्य वेड्यातच गेलं ...

उसासा टाकुन मग कामाला लाग
शेवटच एकदा माझ्याशी वैर्यासारखी  वाग
थोडीशी राख माझी बांधून घे
जड़ झाली तर वहायला नदीवर ने....

राख नादित वाहून दे ,सगळकाही संपलं असेल
जे झाल माझ्यासंगे  तुझ्या ध्यानातही उरल नसेल
संपलेल्या खेळाचा मग तू संपून टाक डाव
फ़क्त वहायचा आधी राख  एकदा हृदयाला लाव..

बघ... राखेचा एक कण तुझ्या हातावर राहिल
शेवटच का होईना तुझाकड़े आशेन् पहिल
त्यालाही तुझा अश्रुची चव तू कळवणार का ?
विझवून अश्रुत एकदा पुन्हा त्यास्...
जळवणार का..... ?


Unknown

एक डाव हाताचा ..........................!!

आज पासूनच कॉलेज ला सुट्टी लागली होती ..खूप दिवसानंतर गावी येत होतो .. घरातील सर्वांबरोबर मित्रांची पण ओढ लागली होती ..गावी आल्यावर साहजिकच खूप दिवसानंतर माझ्या बालपणीच्या मित्रांमध्ये मिसळणार होतो ..लहानपणीच्या आठवणी , गमतीजमती परत एकदा अनुभवणार होतो .. बस मध्ये प्रवास करताने कधी माझं गाव येईल असा झाल होत ......गावाबद्दल असणारी अनामिक ओढ , गावातील शाळा , गावातील मंदिर , आणि मंदिरासमोर असणारी   आमचा खेळायची जागा ...तिथेच क्रिकेट , तिथेच कब्बडी , खो खो आणि मारामारी पण ... सर्व काही तिथेच ........

गावात आल्याबरोबर सुंदर हिरव्यागार पिकांनी स्वागत केले .घरी जाऊन ब्याग ठेवली ..आणि लगेच मित्रांकडे निघालो ...मला बघून त्यांना खूप आनंद झाला ..मित्र असे मोजकेच सुधांशू आणि प्रणय ...पण खूप जिवलग मित्र ..अगदी जीवास जीव देणारे ..आज रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या ..बसल्या बसल्या दुसर्या दिवशी picture ला जाण्याचा बेत केला ..

picture जायचे म्हणजे शेजारच्या गावात जावे लागे ....तेही तीन चार किलोमीटर ..आमच्या गावापासून दूर ..रहदारी हि तशी कमीच ...जायला साधन नाही रात्रीचा सिनेमा ..आम्ही पायीच निघालो  .. जवळ जवळ १२.१५ वाजता सिनेमा संपला ..गावाला जाण्यासाठी त्या सिनेमा टोकिस पासून एक शोर्टकट रस्ता होता ..मी त्यांना म्हणालो यार आपण ह्या शोर्टकट रस्त्याने जाऊ यात .. तर त्यांनी साफ नकार दिला .. का म्हणून विचारले तर सांगायला पण तयार नाही .म्हणाले नको यार सोड आपण आल्या रस्त्यानेच परत जाऊ ...शेवटी जास्त आग्रह केला तेव्हा सांगू लागले .....

आरे त्या रस्त्याने जाताने जो पडका वाडा लागतो ना ...त्या पडक्या वाड्या मध्ये भूत आहे म्हणतात ..आणि ते भूत साधे सुधे नाही खूप विद्रूप आहे ..आत मध्ये खोलवर गेलेले डोळे ... आणि त्याला एक हातच नाही .... हाताच्या जागी घोड्याचं खूर आहे ...अगदी नाल ठोकलेल...

मी सायन्स चा विध्यार्थी माझा अश्या भूता-खेतांवर विश्वास नव्हता ..भूत हा प्रकार च अस्तित्वात नाही हे शिकलो होतो मी .. पण आतमध्ये कुठेतरी किंचितशी भीतीची जाणीव होता होती ...पण तरीही मला डेअरिंग दाखवायची लहर आली ..त्यांनी आग्रह करूनही मी ऐकले नाही ..तर ते म्हणाले तुला जायचे तर जा ..आम्ही नाही येणार ..तर मी म्हणालो ठीक आहे ..आणि शोर्ट कट चा रस्ता धरला ...

शेवटी मनाचा निर्धार करून मी  एकटाच निघालो होतो ... अमावसेची रात्र असल्यामुळे सर्व बाजूस काळाकुट्ट अंधार पसरला होता ..मागे , पुढे आणि आजूबाजूला हि अंधारच अंधार ..चार हि बाजूने घनदाट झाडी त्यामुळे रस्त्यावर पण काही दिसत नव्हत ...अंदाजाने एक एक  पूल पुढे टाकत जात होतो ...वातावरणात भयानक शांतता पसरली होती .दूरवर कुठेतरी कुत्रे भुंकण्याचा आवाज कानी पडत होता ..रातकिड्यांचा करकर आवाज अंगाला घासून जाऊन अंगाला शहारे आणत होता .. वाऱ्याची एक जोरदार झुळूक येऊन  शेजारच्या झाडीत आवाज करून निघून जात होती ..पुढे दूरवर कुणीच दिसत नव्हते.... दिसत होता ..तो फक्त अजाण  पडका वाडा ......

   आता तो पडका वाडा हळू हळू जवळ जवळ येऊ लागला होता ..लांबूनच त्या पडक्या वाड्याजवळ असणारी tubelight नजरेस पडत होती ..परंतु ती tubelight  मधेच बंद पडत होती ..आणि पुन्हा चालू होत होती ..आता खूपच जवळ येत होता तो अजाण पडका वाडा....एकदम  भयाण असा मोठा वाडा .. दोन्ही बाजूला दोन मोठे मोठे चिंचेचे झाडं..गर्द पानांनी भरलेली ....वाड्यावर बाहेरून वर जाणारा जिना..एक मोठा दरवाजा ..अर्धवट बंद अर्धवट उघडलेला ..वाऱ्यामुळे  हलून त्यातून कर कर असा आवाज येत होता ..अर्ध्यावर जिन्याच्या पायरीची एक फारशी निखालेली ...तसीच ..कधी कोणाच्या डोक्यात पडेल नेम नाही ... या स्थितीत ..वाड्याच्या छताचे कौल खाली  घसरलेले ..चारी बाजूंनी मोठे मोठे वाढलेले गवत ...वाड्याच्या समोर असलेल्या तारेवर ...चार वाट वाघुल  उलटे लटकलेले ...आता माझ्या मनात भीती दाटू लागली ..छातीत पण धडधड सुरु झाली होती ....

  आता तो वाडा आणि मी ..आमचं दोघांमध्ये  फक्त एक ओढ्याचा अंतर होतं ..ओढा उतरू लागलो  तर झप्प.... असा आवाज करत एक पक्षी पायाजवळून उडत गेला ...क्षणभर घाबरलो ..पण पक्षी होता हे बघून भीती निघून गेली ...आता पूर्णपणे ओढ्यात उतरलो होतो ..सर्वत्र काळोख पसरला होता कारण आता वाड्या जवळील tubelight ओढ्यात असलेमुळे दिसत नव्हती ..ओढ्यात मध्यभागी असताने कोणीतरी मला मागून खडा मारताय असा भास झाला ..मागे वळून पहिले तर कोणीही नाही .. परत चालायला सुरवात केली .. परत खडा लागला ..थांबलो , खडा लागायचा बंद ...चलू लागताच खडे लागणे सुरु ,,,, पुरा घाबरलो होतो ... जसा जसा जोरात चालू लागलो  .तशे खडे आणखीनच मागून  लागयला लागले ... आता सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता ..चप्पल काढून पळणार तर स्वताशीच हसलो ..कारण चपलेवर ओढ्याची वाळू आलेवर ती उडून मागे लागत होती .....!!1

 आता ओढा चढून वर येत होतो ..तर पुन्हा tubelight  दिसायला लागली ...आणि तो वाडा सभोतली घनदाट झाडी ...तेवढ्यात tubelight सुरु झाली ..आणि त्या tubelight खाली कोणीतरी बसल्याचा मला दिसलं...वाटला पळत जाव पण नंतर विचार आला न जाणो खरच तिथे काही असेल तर थोड्या वेळानं येणाऱ्या वादळाला अगोदरच का समोर जावं ..आता परत light  बंद .. आता मागेही जाऊ शकत नव्हतो .. मागेही काळाकुट्ट अंधार ...आता जवळ जवळ वाड्या जवळच  आलो ..आणि tubelight पासून पुढे जाणार तोच light  सुरु झाला ...आणि माझा श्वासाच क्षणभर थांबला ... त्या  tubelight  खाली .. एक खूप जीर्ण म्हतारा , फाटके कपडे , हातभार वाढलेली दाढी , आत गेलेले डोळे ..एक दात बाहेत आलेला ..आणि जवळ जवळ हाडांचा सापळाच अशी व्यक्ती बसली होती ...मी दुसरीकडे तोंड करून चालू लागलो ...तर आवाज आला , " कुच्ध चार आठ अना दे दो साहब " ...!!

   आता मात्र मी खूप घाबरलो होतो .. अंग पूर्ण थंड पडला होता .. पाय पण उचलत नव्हता ..हात जड झाले होते ..सर्व्नागाचा थरकाप चालला होता .. तरी शेवटी सर्व शक्ती एकवटून मी खिशात हात घातला ..आणि जेवढे पैसे येतील तेवढे त्याचे हातावर ठेवणार .....तर मला धक्काच बसला ...त्याला हात नव्हताच ....हाताच्या जागी घोड्याचं खूर होतं अगदी नाल ठोकलेल ...............................!!


मी तसेच सर्व पैसे  टाकून पळत सुटलो ..आणि आमच्या मुख्य  रस्त्याला लागलो ...समोरून एक घोडागाडी जाताने दिसली .. त्यामध्ये कोणीतरी काळी घोंगडी अंगावर पांघरून ती चालवत होतं..मला ती गाडी बघून धीर आला .. मी पळत पळत जाऊन ती घोडागाडी  पकडली आणि न विचारता घोडा गाडीत चढलो ..तसाच मन खाली घालून पडून राहिलो ...थोडावेळ दोघे हि शांतच ..नंतर तो म्हणाला बाळ ! घाबरलेला दिसतोस ... तर मी म्हणालो हो ..आणि सर्व हकीकत त्याला सांगण्यास सुरवात केली ...कि तो बसलेला भिकारी आणि ....त्याचे हाताचे जागी हात नव्हताच ..घोड्याचा खूर होतं नाळ ठोकलेल....

  त्याने न बोलता सर्व इकून घेतलं.. आणि नंतर शांतपणे म्हणाला ..खूर होतं नाल ठोकलेल .. मी म्हणलो हो ..तर त्याने दाणकन माझी मान पकडून उचलला आणि आपली काळ्या घोंगडी तून हात बाहेर काढून दाखवत विचारलं हे असं......!!  आणि बघतो तर काय ...त्याच्या हाताच्या जागी हात नव्हताच ........हाताच्या जागी घोड्याचं खूर होतं अगदी नाल ठोकलेल ...............................!!


सनी ....एक वेडा मुलगा ...

शेवटी मी एकटीच .........

नुकताच कॉलेज जीवन संपवून बाहेरचं जगात प्रवेश सुरु झाला होता ..आणि आता एवढे कॉम्पुटर इंजिनिअर  करून सोडल्यावर घरच्यांचे  सर्व स्वप्नं सत्यातसाकार  करणं हे माझं कर्तव्यच होतं... तसं पाहिलं तर माझं घरी होतं तरी कोण ? फक्त माझी आई आणि तीच माझे साठी माझं सर्वस्व  होती  माझेसाठी ..हो खरं आहे हे दुसर्यंची धुनी भांडी करून तिनं मला शिकवलं तिनं .. स्वतः एक दिवस उपाशी झोपली असेल पण मला जेवायला दिलं..माझी सर्व कॉलेज ची फी भरली तिनं ...ती स्वतः उघड्यावर झोपली असेल पण मला पांघरून दिलं तिनं ..आणि आज कुठ तिला माझे रूपाने एक आशेचा किरण दिसत होता ..आणि मला हि आईला सुखी ठेवायचे होते .....

   सुदैवाने मला चांगल्या आय टी कंपनी मध्ये जॉब पण मिळाला ..मला जॉब मिळाल्याचा आनंद माझेपेक्षा माझ्या आईलाच जास्त झाला होतां..देवापुढे पेढा ठेवून कॉलोनी मध्ये  इतरांना भरवताना चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होतां तिच्या ...मस्त दिवस सुरु होते .. आईला खूप सुखी ठेवण्याचा मी प्रयत्न करत होतो ..

  आता आई ने एक दिवस मला विचारलेच ..सिद्धांत आता माझी फक्त एक जबाबदारी बाकी आहे ती म्हणजे तुझं लग्न आणि यातून एकदा  कि मी या जबाबदारीतून  बाहेर पडले की मोकळी झाले ..मी हि आईला लगेच होकार सांगितला ....

    आईने सुचवलेला स्थळ म्हणजे प्राजक्ता ... प्राजक्ता दिसायला नक्षत्रासारखी होती .. लांबसडक काळेभोर रेशमी केस , तपकिरी डोळे , गोरा रंग , आणि  सतत  चेहऱ्यावर हास्य .. हसाताने गालावर  पडणारी नाजूक खळी .. मनाला वेड लावून जात होती ...त्यामुळे कि काय कोण जाने प्रथमदर्शीच मी तिच्या प्रेमात पडून संमती दाखवली ... आई पण एकदम खुश झाली तिने तर अगोदरच तिला पसंद करून टाकली होती ...

 श्रीमंतीत वाढलेली , अलेषण गाडीमध्ये फिरणारी  प्राजक्ता माझे बरोबर एक बेडरूम फलाट मध्ये राहील कि नाही याची मला शंकाच होती पण तिने आमची शंका साफ खोटी ठरवली ..लग्नाला दोन वर्ष झाली तरी फक्त एकदाच माहेराला गेली होती एवढी समरस अम्चेत झाली होती ..माझ्या आईला आईच बोले आई पण तिचेवर मुली सारखा प्रेम करी ...ती पण आईची माझेपेक्षा जास्त काळजी घेत असे .. मला  आमचा आयुष्य हे स्वप्नं तर नाही न असा भास कधी कधी होत असे ...

 मी ऑफिस ला गेलेवर आई तिला माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगत बसे ..मीही प्राजक्तावर खूप प्रेम करयचो .आणि तीही मला सर्वस्व मानायची .. माझेपासून एक दिवस दूर राहणे तिला आवडत नसे ..आणि म्हणूनच ती माहेरी पण कमी जाई ..आणि असेच दिवसामागून दिवस जात होते एक दिवस मला माझे कंपनी ने पत्र दिले कि मला सहा महिने ट्रेनिंग साठी अमेरिकेला जावे लागणार होते ..एकीकडे खूप आनंद झाला होतां आणि एकीकडे सहा महिन्यासाठी प्राजक्ता आणि आई ला सोडून जावे लागणार या कल्पनेनं दुख हि झाले होते .....

 मी घरी आले वर हि गोड बातमी आई आणि प्राजक्ताला सांगितली ..आईची मान अभिमानाने उंचावली आणि प्राजक्ता ..अभिमान तर होताच पण मला सोडून सहा महिने राहावे लागणार या विचाराने जरा नाखुशाच दिसत होती ..
 रात्री म्हणाली  सिद्धांत तू मला सोडून जाणार ,तर मी म्हणालो आग वेडी कायमचा थोडी जातोय फक्त सहा महिने .. परत येणारच आहे न मी ...आग सहा महिने असे निघून जातील बघ ..मी रोज फोन करील तुला .. मेल वर भेटूच ..तू फक्त आईची काळजी घे ..तर म्हणाली सिद्धांत आई माझी पण आहे ....

 त्यानंतर माझा बालपणीचा मित्र अमित याला आई आणि आणि प्राजक्ता कडे लक्ष ठेवायला सांगून मी अमेरिकेस निघून गेलो ..मी तिथे पोहचले वर लगेच प्राजक्ताच इमेल मिळाला .. लगेच लिहला असेल ...असेच दिवस मागून दिवस जात होते ..रोजचे तिचे इमेल आणि फोन चालू होते .. पण हळू हळू कमी होऊ लागले .. मला वाटले आईची काळजी घ्याला एकटीच असेल न म्हणून असेल कदाचित ...

  आता अमित दररोज येवू लागला होतां ..आई एका टेबल वर बसत आसे आणि प्राजक्ता आणि अमित एका टेबल वर ...हसत हसत गप्पा मारत जेवण चालत असे ..आता तर ते दोघांचे जेवण आणि बाहेर फिरणे हि सुरु झाले ..प्राजक्ता आता सकाळी लवकर बाहेर पडून रात्रू उशिरा परतू लागली ..आईच्या पण मनात शंकेची पाल चुकचुकली .....

   आईनेही तिला समजावले आग प्राजक्ता ..समुद्रातील मासोळीला समुद्राच्या पाण्यापेक्षा जर किनारयाचीच जास्त ओढ असेल तर ती काय कामाची ? तू एक स्री आहेस परपुरुषाबरोबर एवढी जवळीक चांगली नाही ..हेच जर सिद्धांताला समजले तर क्या वाटले त्याला ..? त्याच्या मनाचा कधी विचार केला आहेस तू ? त्यावर म्हणाली तर मी काय करू माझ्याही इच्छा , आशा , आकांक्षा आहेत ..सिद्धांत मला एकटी सोडून गेला थोड्याश्या पैशासाठी ..आणि हो अमित मला परपुरुष नाही आहे ..माझं प्रेम आहे अमित वर .. मी आणि अमित लग्न करणार आहे आमी घटस्पोट देतेय मी सिद्धांतला ...

   आईचे पाय कापू लागले ,,,हृदय दुभंगले आणि थरथरत्या हाताने तिने मला लिहिण्यास सुरुवात केली ....प्रथम माझं हि विश्वासच बसेना .. खरच असेल वागेल प्राजक्ता आणि एवढा फरक पडेल ४ महिन्यात ? पण माझ्यासाठी सर्व काही करणारी आणि माझ्या सुखात तिचं सुख मानणारी माझी आई .. माझेशी खोटा का बोलेल ? रात्रभर विचार करत होतो .. शेवटी मी अमितला पत्र लिहिला

प्रिय अमित

खरच लहानपणापासूनच्या मैत्रीची परतफेड खूप चांगली केलीस ..खूप चांगलं लक्ष दिलं आई आणि .....मुख्य म्हणजे प्राजक्ता कडे .. तुला माहित आहे जो सूर्य ज्या पृथ्वी साठी रोज उगवतो , मावळतो ती पृथ्वीच कधी कधी त्याला ग्रहण लावते ..खरच प्राजक्ता ने माझा अनमोल विश्वास गमावला आहे ..आणि हो अमित जर तिला तुझ्यात रस असेल तर मी आजच तिला विभक्त करीत आहे ....

तुझाच दुर्दैवी मित्र

सिद्धांत

माझे पत्र वाचालेवर तो भानावर आला ..डोकं एकदम सुन्न झाले त्याचे ..दररोज ज्या बीच वर ज्याचे आजही त्याच बीच वर एकटाच जावून बसला होतां ..तेवढ्यात मागून कोणीतरी गळ्यात हात टाकला ..प्राजक्ताच होती ती ....आज खूप खुश दिसत होती ..म्हणाली अमित आज मी खूप खुश आहे आता आपल्या लग्नाला कोणी हि अडवू शकत नाही ...आजच सिद्धांतला घटस्पोट देवून आलेय मी ..

 विजेचा शॉक बसावा तसा अमित जागा झाला ..म्हणाला प्राजक्ता काय केलास तू हे ..खूप मोठी चूक केलीस सिद्धांत बरोबर प्रतारणा करून ..तुला काय वाटलं मी तुझेशी लग्न करील म्हणून ? तू कुठे एक घटस्पोटीत स्री ..आणि मी एक अविवाहित तरुण ..तुझेशी लग्न केले तर मला लोक , नातेवाईक , मित्र काय म्हणतील ? समजा काय म्हणेल ? आणि काहीही न बोलता तिचा हात गळ्यातून काढून टाकत तिथून निघून गेला ...प्राजक्ता म्हणाली नको रे असा करूस .. मी नाही राहू शकत तुझेशिवाय ..तूच संग न आता मी काय करू ? पण  हे सर्व इकायला तो होता कुठे तिथ केव्हाच खूप दूर निघून गेला होता ...खरच कितीशा सुखासाठी प्राजक्ताने माझा अनमोल विश्वास तोडला होता ना ??आज हि ती बीचवर जातेय पण एकटीच ....

  मध्यंतरी माझा हि निशाशी लग्न झालं..आईने सर्व माझी मागची कहाणी निशा ला ऐकवली होती आणि एवढे ऐकून सुद्धा तिने माझेशी लग्नाला होकार दिला होता ....भूतकाळ पूर्ण विसरून आम्ही नव्या स्वप्नात रममाण झालो होती ... असाच एकदिवस रविवार ची सुट्टी असलेमुळे tv  बघत बसलो होतो ...आई बरोबर .तेवढ्यात पेपर वाल्याने झाप दिशी पेपर दरवाज्यातून आता ढकलला .. पहिल्याच पानावर लक्ष केंद्रित झाले .. बातमी होती   " प्राजक्ता देशमुख चा समुद्राच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू  ..."
सहज वर पहिले शेजारी निशा उभी होती....तिच्या डोळ्यात आनंद आणि एका अंकाचा शेवट हि विजय मुद्रा ........................!!!!!





सनी एक वेडा मुलगा ................!!!

का पण .......?

तेंव्हा तुझ्यात मी  इतका

वेड्यासारखा गुंतलो होतो

की तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं देखील

माझ्याने सहन करणे

अशक्य होतं.....

नेहमीच निमुटपणे जगत होतो

त्या जगाच्या ठरवलेल्या

झिजलेल्या पाऊलवाटेवर.....

तुझ्या पायाखाली मखमल पसरताना ....

मी मात्र निखा-यांवरुनच चालत होतो.....

रक्ताळलेले पाय असुनही

तुझ्यासमोर मात्र अजुनही

हसत होतो.....

त्या रक्ताळलेल्या पाऊलखुणा दिसु नयेत म्हणुन

कायम प्रयत्न करत होतो..

पण तु नाही समजुन घेतलेस,

खुप गोड स्वप्न पाहीली होती मी.....

अन…

त्याच दिशेने तर चालत होतो....

पण तु........

तुला दिसत होता……

तो माझा राग……

माझी चिडचिड……

बस......

त्या चिडण्यामागचे प्रेम….

माझी तळमळ…..

ह्याला काहीच किंमत नव्हती............?

फक्त तुला दिसायचे माझे दोष ....

बाकी लोकांचं तुला बरोबर वाटायचं ....

चुकत तर फक्त मी होतो .....

बरोबर ना ......

मला अजूनही समजत  नाही आहे ..

बाकी लोक तुला का जवळ वाटतात ...

का विश्वास तुझा तुझा एवढा त्यांचेवर ....

का तुला फक्त त्यांचंच पटतं...

कायम मीच चुकतो का ?

सांग ना  PLz .....

कायम मीच चुकतो का  ?

मला याचं फक्त उत्तर हवंय.....................!!

प्रेम भावना तू समजून घेशील का ?

माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?
जीवनाच्या वाटेवर जीवनभर साथ देशील का?

माझ्या मनाच्या कोपऱ्यात
नयनांच्या माझ्या पापण्यात
थोडा वेळ विसावशील का ?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्या एका नजरे साठी
असतो सदा तुजपाठी
मज भरकटलेल्या
जीवन मार्गावर आणशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

एकच ध्येय माझ्या जगण्याचे
तुला माझी झालेली बघण्याचे
करण्या मज इच्छापूर्ती
तू पुढे येशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का?

तुझ्यात असतो मी गंभीर
करतेस मज तू अधीर
शेवटचे मागणे ..
हाती हात देशील का?
माझ्या मनातील प्रेम भावना तू समजून घेशील का ?

वाटेच्या वाटसरा ...........!!

आज ऑफिस मधून लवकरच घरी आलो . अपर्णा माझी वाट पहातच बसली होती ..परंतु  तिचे समोर बसलेला दिलीप बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला . दिलीप माझ्या मामांचा मुलगा खूप दिवसापासून  आमचेकडे आला नव्हता .. हाय -हेलो झालेवर मी त्याला येण्याचे कारण विचारले .. तर तो म्हणाला अरे  सुनील ! ती नागपूरची जागा आणि घर विकायचे आहे .. मी निघालोच आहे ..तू  पण येत असेल तर बघ तेवढीच सोबत होईल .म्हणून तुला विचारण्यासाठी आलो आहे ..मी लगेच होकार देऊन टाकला ...अपर्णा ने आश्यर्य चकित होऊन माझे कडे पहिले .. कारण मी एवढे सहज सहजी तयार होईल याची कल्पनाच पण तिने केली नसावी ......पण यामागचे गुपित फक्त मलाच माहित होते .

    दिलीप सकाळी लवकर उठला ..लवकर तयार होऊन आम्ही  कार ने निघालो ..थोडे अंतर गेलेवर दिलीप मला म्हणला तुला झोपायचे असेल तर झोप ..मी नागपूर जवळ आलेवर तुला उठवतो ...मलाही निवांतपणा हवाच होता .मला खूप बरे वाटले मी पण  लगेच हो म्हणालो आणि माझ्या मनाने भूतकाळात केव्हा प्रवेश केला मलाही ही समजले नाही ....

     त्यावेळी फार नाही पण सातवी आठवीला असेल. वडिलांची बदली कलकत्त्याला झाली ..language  चा प्रोब्लेम म्हणून शिक्षणासाठी मामांकडे मला ठेऊन ते गेले . मामा खूप चांगले ...मामी पण आई प्रमाणे प्रेम करीत ...दिलीप आणि मी एकाच वयाचे म्हणून करमायचं पण प्रोब्लेम नव्हता ...सर्व कसे वातावरण एकदम छान होते . शेजारीच निशा राहत होती ...निशा हि शेजारील भाडेकरूची मुलगी ..तिचे आई बाबा काहीतरी छोटा मोठा काहीतरी धंदा करत होते ...त्यांची मिळकत पण जेमतेम  ...म्हणजे जे मिळवत ते  पोटापुरते .... त्यात खाणारी तोंड ४-५ म्हणून कदाचित शिल्लक काहीच राहत नसावे ...

  निशा गोरी नसली तरी दिसायला सुंदर होती , लांबसडक कमरेपर्यंत येणारे केस , सरळ आणि टोकदार नाक , समोरच्याला घायाळ करील असे हास्य , नाजूक बांधा , पाणीदार डोळे , आणि हसताने गालावर पडणारी खळी यामुळे तर ती खूंच सुंदर दिसत होती ... कोणालाही पहिल्यांदाच आवडेल अगदी अशीच  होती . परमेश्वराने  ने सौंदर्याची जणू बरसात च केली होती तिच्यावर ...आणि म्हणूनच काय कोण जाने मी हि बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडलो ....

   निशा कधी - कधी दिलीप कडून गणित सोडून घेण्यास येत असे अशीच एक दिवस आली दिलीप घरात नव्हता ..मामी ने सुनील कडून सोडवून घे असे सांगितले ..आणि मला आवाज  देऊन सांगितले  अरे सुनील ! हिला एवढे गणित सोडवून दे .. मी हो म्हणालो ..गणिताचे  पुस्तक माझेकडे देऊन ती माझे समोर येऊन बसली ..मी गणित समजून सांगताने तिचे लक्ष गणिताकडे नव्हतेच  ती माझे चेहऱ्याकडे च बघत होती .. मी हि पूर्ण विसरून तिच्याकडे पाहत होतो .... डोळ्यात डोळे घालून बघत असतानाच मामीच्या आवाजाने भानावर आलो . " झाले का गणित सोडवून ?? " ती  हो म्हणाली  आणि माझ्या हातातून पुस्तक घेऊन हसत - हसत बाहेर निघून गेली ..कदाचित तीच आमच्या प्रेमप्रकरणाची पहिली सुरवात असावी ....

   आता निशा रोज आमचेकडे गणित सोडवण्यासाठी येऊ लागली... मामी जेवाताने सुनील आलेपासून निशाचे आपलेकडच येणे वाढलंय असा हसत हसत कधीतरी म्हणाल्याचं आठवते .. आम्ही सर्व मित्र -मैत्रिणी  जेवणा नंतर गाण्याच्या भेंड्या पण खेळायचो.. प्रेमाचे गाणे आलेवर .. निशा माझेवर तिरकस कटाक्ष टाकायची ... मला ते अजूनही आठवतं आहे ...आणि खूप छान  असा smile द्यायची ..असेच  दिवसामागून दिवस जात होते ....रविवारी सुट्टीचे दिवशी आम्ही फिरायला हि जायचो ...फिरायला गेलेवर बरोबर नेलेला डब्बा खाता खाता पक्षाने घेतलेली असमान भरारी बघाताने खूप गम्मत वाटे ...

    जेवण झालेवर ...आम्ही कधी कधी कॅरम आणि पत्ते पण खेळायचो ... पत्त्यामधील रम्मी खेळाताने निशा मुद्दाम हून मला पानं सोडतेय आणि मी जिंकतोय असा मला वाटे ...कदाचित पत्त्यामधील गेम जिंकण्यापेक्षा माझं मन  जिंकण तिला महत्वाचा वाटत असावे ...खूप गप्पा पण मारायचो ... पण बाकी सर्व जन लहान म्हणून मी जे काही बोलत होतो ते सर्वात जास्त निशालाच समजत असावे कारण तीच जवळ जवळ माझे एवढी समजदार होती ...निशा खूप अभ्यासू आणि हुशार होती ...

मी आता मोठा झालो होतो ... college ला पण जाऊ लागलो होतो .. निशा माझेकडे येऊन माझे मराठीचे पुस्तक काही समजते का बघते म्हणून घेऊन जाई .. मी पण तिची आवड बघून माझ्या कॉलेज laibrary मधून गोष्टींचे पुस्तके आणून तिला वाचायला देऊ लागलो .. यामुळे कि काय कोण जाने निशा अधिकच माझे जवळ येवू लागली .......!!!



असेच दिवसामागून दिवस जात होते ... निशा आणि माझ्यामध्ये काहीतरी वेगळे नाते निर्माण झाल्याची मला जाणीव होत होती ..निशाबद्दल काही तरी वेगळे आकर्षण वाटू लागले होते ...आता निशा आणि मी तासंतास गप्पा मारत बसू लागलो  .. मी माझ्या कॉलेज मधील गमतीजमती तिला सांगत असे आणि ती पण शाळेतील आणि घरातील सुद्धा माझेबरोबर share करत असे.. किती छान दिवस होते ते ....हे दिवस संपूच नये आसे मला वाटे ..

  निशाला आपल्या प्रेमाबद्दल सांगावेसे खूप वेळेस वाटले पण धीर झाला नाही ..एक मन म्हणे अरे सांगून टाक..तीही तुझ्यावर तेवढेच प्रेम करत असेल तर .. जेवढा तू करतोस ..पण एक मन म्हणे नको ..जर ती तुला चांगला मित्र मानत असेल आणि म्हणून सर्व तुझेबरोबर share करत असेल तर ?केवढा धक्का बसेल तिला .आणि तिच्या बालमनावर किती ताण येईल याचा विचार केला आहेस तू ? म्हणून मी तिला केव्हाच म्हणालो नाही ...

  असेच एकदम आनंदात दिवस चालले होते ...पण म्हणतात ना नियतीला सर्वच गोष्टी मान्य नसतात ..ती कधीतरी आपला रंग दाखवतेच  अगदी तसेच झाले शेवटी नियतीने आपला रंग दाखवलाच ...मामाकडे बाबांचा फोन आला त्यांची बदली परत पुण्याला झाली ..आणि ते आठ दिवसात मला नेण्यासाठी येणार होते . आता या सर्व मुलाना आणि त्यातल्या त्यात निशाला सोडून जाणे ह्या नुसत्या विचारानेच माझे डोकं फिरू लागले होते . काय करावे सुचत नव्हते .रोज समोर हसणारी , खेळणारी निशा आठ दिवसानंतर माझे समोर नसणार होती ...नुसत विचार केला तरी अंगावर काटा  उभा राहत होता ...शेवटी बाबा आलेच ...

 माझे जाण्याचे आधल्या दिवशी आम्ही सर्व मित्र एकत्र जमलो ...सर्वजन आले होते.. पण अजून निशा आली नव्हती ..सर्व मुला-मुली  मला मी परत कधी येणार , तिकडे काय करणार , आम्हाला विसरणार तर नाही ना? असा विचारात होती .माझा लक्ष त्यांचेकडे नव्हतेच मी निशाची वाट पहात होतो ...शेवटी निशाही आली येऊन माझे शेजारीच ती बसली ..निशा आज शांत -शांतच वाटत होती ... तिचा चेहराही पडला होता ..काहीच बोलत नव्हती ..थोडावेळ बसून .आई बोलावतेय ..येते रे सुनील ! असा म्हणून गेली सुद्धा ..पण जाताने तिच्या डोळ्यात पाणी आले ..ओघळ थेट गालापर्यंत आला .पण तिने क्षणार्धात तो डाव्या हाताने पुसून टाकला ....कदाचित तो माझा भास हि असेल ..

  ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्यादिवशी वडिलांबरोबर पुण्याला निघून गेलो ....आणि ज्यावेळी आपल्या घरात आपल्या लग्नाचा विषय निघेल त्यावेळेस निशा चं नाव सुचवायचा असा मनाशी पक्का निर्धार केला ..आणि पुण्यात माझं daily Routine सुरु केलं .. असाच मध्यंतरी दिलीपचं एक पत्र आला त्यात त्याने  "निशाच लग्न झाले "अस लिहिले .....जशी काच जमिनीवर पडून तिला असंख्य तडे जावेत असे तडे माझ्या एकतर्फी प्रेमाला गेले ..खूप वायीट वाटले ..त्यादिवशी रात्रभर रडत होतो ..शेवटी झाले गेले विसरून बाबांनी सुचवलेल्या मुलीशी लग्न केले .... आणि आज एवढ्या दिवसानंतर दिलीप ने पुन्हा नागपूरला जाण्याचा विषय काढला आणि म्हणूनच मी होकार हि  देऊन टाकला ....एवढ्यात नागपूर हि आले .. दिलीप चा आवाज आला झाली कारे झोप ?...मी हो म्हणालो .....

 काल प्रवासामुळे थकल्यावर लगेच झोपलो ..सकाळी दिलीप ने लवकर आवरून मला उठवले ..मी हि दहाच मिनिटात तयार झालो . दिलीप म्हणाला मी  वकीलाबरोबर जाऊन येतो तू आलास तरी हरकत नाही पण उगीच बोअर होशील म्हणून ..पाहिजे तर निशाकडे जाऊन ये ..शेजारीच मारुतीच्या मंदिरासमोरच एक किराणामालाच छोटासा दुकान आहे त्याचे मागील बाजूसच राहते ती ..मला हि तेच हवं होतं. दिलीप ने दिलेलेल्या पत्त्यावर घर लगेचच सापडलं..........

     मला समोर बघतच निशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य असे संमिश्र भाव तरळले . अरे सुनील ! इकडे कुठे आलास  ? मला आतमध्ये घरात बोलावून आणि मला बसायला टाकून ती आत मध्ये निघून गेली . माझ्याहातावर चहा ठेऊन आलेच हं !असा म्हणून मुलींचे शाळेत जानेसाठी वेण्या- फनी  करण्यासाठी गेली ..... मध्यंतरी वेळ काढून चहा घेण्यासाठी तिचा नवरा हि दुकानातून येऊन गेला..तिने त्याचेशी माझी ओळख करून दिली ..निशाला एवढा कृश नवरा हि कल्पनाच मला सहन होत नव्हती . सलग तीन मुली झालाय म्हणून सतत तिच्यावर रागावणारी तिची सासू ...माझी व हिची काय ओळख या अविर्भावात इकडून तिकडे करत होती ....

    शेवटी मुलीना शाळेत पाठवून , सासूस पुजेची तयारी करून देऊन ती माझेसमोर येऊन बसली ..सुरवातीला दोघेही शांत ...टाचणी पडावी तरी आवाज व्हावा अशी शांतता..  शेवटी मीच तिला म्हणालो सध्या काय करतेस काही वाचतेस कि नाही ...तर म्हणाली वाचते वेळ मिळाला , पुस्तक मिळाला तर कधी कधी ...पण पूर्वी वाचलेला सर्व लक्षात आहे माझ्या ..आणि काही तरी आठवल्यासारखा एकदम जोरात म्हणाली ...सुनील , तुला ती कविता आठवते का रे ..." वाटेच्या वाटसरा ...........
.........जाई दुजा गावा ....पुढच्या जन्मी तुझा हिशोब करीन ! .........या जन्मी  मी पराधीन .....!."

    पूर्वी ती शाळेत असताने मीच कोणीतरी एका मोठ्या लेखिकेने लिहिलेल्या या कवितेचे रसग्रहण तिला केले होते ... " एक प्रियसी , आपले जुन्या प्रियकराला हात जोडून विनवते ....हे प्रियेकरा ! जुन्या आठवणी तश्याच झोपलेल्या राहू देत त्यांना जाग्या करू नकोस ..!  ' आठवणींचा नाग डंख करेल त्याला फना वर काढू देऊ नकोस !'  असा अर्ध्यावर येऊन माझ्या फुललेल्या , बहरलेल्या संसारात विष कालवू  नकोस ....तू आल्या पावली परत निघून जा ......या जन्मी मी दुसऱ्याची आहे ..पण हे प्रियकरा ! मी तुला वचन देते पुढच्या जन्मी मी  नक्कीच तुझी होईल..............."

  आज तिने या कवितेची तिने आठवण करून दिली आणि इतक्या दिवस मनात असलेल्या कुतुहलाचे ..प्रश्नाचे मला उत्तर मिळाले ....आणि मी लगेच तिचा निरोप घेतला ...तो परत कधीही न भेटण्यासाठीच



सनी ..एक वेडा मुलगा