Monday, February 14, 2011

एक डाव हाताचा ..........................!!

आज पासूनच कॉलेज ला सुट्टी लागली होती ..खूप दिवसानंतर गावी येत होतो .. घरातील सर्वांबरोबर मित्रांची पण ओढ लागली होती ..गावी आल्यावर साहजिकच खूप दिवसानंतर माझ्या बालपणीच्या मित्रांमध्ये मिसळणार होतो ..लहानपणीच्या आठवणी , गमतीजमती परत एकदा अनुभवणार होतो .. बस मध्ये प्रवास करताने कधी माझं गाव येईल असा झाल होत ......गावाबद्दल असणारी अनामिक ओढ , गावातील शाळा , गावातील मंदिर , आणि मंदिरासमोर असणारी   आमचा खेळायची जागा ...तिथेच क्रिकेट , तिथेच कब्बडी , खो खो आणि मारामारी पण ... सर्व काही तिथेच ........

गावात आल्याबरोबर सुंदर हिरव्यागार पिकांनी स्वागत केले .घरी जाऊन ब्याग ठेवली ..आणि लगेच मित्रांकडे निघालो ...मला बघून त्यांना खूप आनंद झाला ..मित्र असे मोजकेच सुधांशू आणि प्रणय ...पण खूप जिवलग मित्र ..अगदी जीवास जीव देणारे ..आज रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगल्या ..बसल्या बसल्या दुसर्या दिवशी picture ला जाण्याचा बेत केला ..

picture जायचे म्हणजे शेजारच्या गावात जावे लागे ....तेही तीन चार किलोमीटर ..आमच्या गावापासून दूर ..रहदारी हि तशी कमीच ...जायला साधन नाही रात्रीचा सिनेमा ..आम्ही पायीच निघालो  .. जवळ जवळ १२.१५ वाजता सिनेमा संपला ..गावाला जाण्यासाठी त्या सिनेमा टोकिस पासून एक शोर्टकट रस्ता होता ..मी त्यांना म्हणालो यार आपण ह्या शोर्टकट रस्त्याने जाऊ यात .. तर त्यांनी साफ नकार दिला .. का म्हणून विचारले तर सांगायला पण तयार नाही .म्हणाले नको यार सोड आपण आल्या रस्त्यानेच परत जाऊ ...शेवटी जास्त आग्रह केला तेव्हा सांगू लागले .....

आरे त्या रस्त्याने जाताने जो पडका वाडा लागतो ना ...त्या पडक्या वाड्या मध्ये भूत आहे म्हणतात ..आणि ते भूत साधे सुधे नाही खूप विद्रूप आहे ..आत मध्ये खोलवर गेलेले डोळे ... आणि त्याला एक हातच नाही .... हाताच्या जागी घोड्याचं खूर आहे ...अगदी नाल ठोकलेल...

मी सायन्स चा विध्यार्थी माझा अश्या भूता-खेतांवर विश्वास नव्हता ..भूत हा प्रकार च अस्तित्वात नाही हे शिकलो होतो मी .. पण आतमध्ये कुठेतरी किंचितशी भीतीची जाणीव होता होती ...पण तरीही मला डेअरिंग दाखवायची लहर आली ..त्यांनी आग्रह करूनही मी ऐकले नाही ..तर ते म्हणाले तुला जायचे तर जा ..आम्ही नाही येणार ..तर मी म्हणालो ठीक आहे ..आणि शोर्ट कट चा रस्ता धरला ...

शेवटी मनाचा निर्धार करून मी  एकटाच निघालो होतो ... अमावसेची रात्र असल्यामुळे सर्व बाजूस काळाकुट्ट अंधार पसरला होता ..मागे , पुढे आणि आजूबाजूला हि अंधारच अंधार ..चार हि बाजूने घनदाट झाडी त्यामुळे रस्त्यावर पण काही दिसत नव्हत ...अंदाजाने एक एक  पूल पुढे टाकत जात होतो ...वातावरणात भयानक शांतता पसरली होती .दूरवर कुठेतरी कुत्रे भुंकण्याचा आवाज कानी पडत होता ..रातकिड्यांचा करकर आवाज अंगाला घासून जाऊन अंगाला शहारे आणत होता .. वाऱ्याची एक जोरदार झुळूक येऊन  शेजारच्या झाडीत आवाज करून निघून जात होती ..पुढे दूरवर कुणीच दिसत नव्हते.... दिसत होता ..तो फक्त अजाण  पडका वाडा ......

   आता तो पडका वाडा हळू हळू जवळ जवळ येऊ लागला होता ..लांबूनच त्या पडक्या वाड्याजवळ असणारी tubelight नजरेस पडत होती ..परंतु ती tubelight  मधेच बंद पडत होती ..आणि पुन्हा चालू होत होती ..आता खूपच जवळ येत होता तो अजाण पडका वाडा....एकदम  भयाण असा मोठा वाडा .. दोन्ही बाजूला दोन मोठे मोठे चिंचेचे झाडं..गर्द पानांनी भरलेली ....वाड्यावर बाहेरून वर जाणारा जिना..एक मोठा दरवाजा ..अर्धवट बंद अर्धवट उघडलेला ..वाऱ्यामुळे  हलून त्यातून कर कर असा आवाज येत होता ..अर्ध्यावर जिन्याच्या पायरीची एक फारशी निखालेली ...तसीच ..कधी कोणाच्या डोक्यात पडेल नेम नाही ... या स्थितीत ..वाड्याच्या छताचे कौल खाली  घसरलेले ..चारी बाजूंनी मोठे मोठे वाढलेले गवत ...वाड्याच्या समोर असलेल्या तारेवर ...चार वाट वाघुल  उलटे लटकलेले ...आता माझ्या मनात भीती दाटू लागली ..छातीत पण धडधड सुरु झाली होती ....

  आता तो वाडा आणि मी ..आमचं दोघांमध्ये  फक्त एक ओढ्याचा अंतर होतं ..ओढा उतरू लागलो  तर झप्प.... असा आवाज करत एक पक्षी पायाजवळून उडत गेला ...क्षणभर घाबरलो ..पण पक्षी होता हे बघून भीती निघून गेली ...आता पूर्णपणे ओढ्यात उतरलो होतो ..सर्वत्र काळोख पसरला होता कारण आता वाड्या जवळील tubelight ओढ्यात असलेमुळे दिसत नव्हती ..ओढ्यात मध्यभागी असताने कोणीतरी मला मागून खडा मारताय असा भास झाला ..मागे वळून पहिले तर कोणीही नाही .. परत चालायला सुरवात केली .. परत खडा लागला ..थांबलो , खडा लागायचा बंद ...चलू लागताच खडे लागणे सुरु ,,,, पुरा घाबरलो होतो ... जसा जसा जोरात चालू लागलो  .तशे खडे आणखीनच मागून  लागयला लागले ... आता सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता ..चप्पल काढून पळणार तर स्वताशीच हसलो ..कारण चपलेवर ओढ्याची वाळू आलेवर ती उडून मागे लागत होती .....!!1

 आता ओढा चढून वर येत होतो ..तर पुन्हा tubelight  दिसायला लागली ...आणि तो वाडा सभोतली घनदाट झाडी ...तेवढ्यात tubelight सुरु झाली ..आणि त्या tubelight खाली कोणीतरी बसल्याचा मला दिसलं...वाटला पळत जाव पण नंतर विचार आला न जाणो खरच तिथे काही असेल तर थोड्या वेळानं येणाऱ्या वादळाला अगोदरच का समोर जावं ..आता परत light  बंद .. आता मागेही जाऊ शकत नव्हतो .. मागेही काळाकुट्ट अंधार ...आता जवळ जवळ वाड्या जवळच  आलो ..आणि tubelight पासून पुढे जाणार तोच light  सुरु झाला ...आणि माझा श्वासाच क्षणभर थांबला ... त्या  tubelight  खाली .. एक खूप जीर्ण म्हतारा , फाटके कपडे , हातभार वाढलेली दाढी , आत गेलेले डोळे ..एक दात बाहेत आलेला ..आणि जवळ जवळ हाडांचा सापळाच अशी व्यक्ती बसली होती ...मी दुसरीकडे तोंड करून चालू लागलो ...तर आवाज आला , " कुच्ध चार आठ अना दे दो साहब " ...!!

   आता मात्र मी खूप घाबरलो होतो .. अंग पूर्ण थंड पडला होता .. पाय पण उचलत नव्हता ..हात जड झाले होते ..सर्व्नागाचा थरकाप चालला होता .. तरी शेवटी सर्व शक्ती एकवटून मी खिशात हात घातला ..आणि जेवढे पैसे येतील तेवढे त्याचे हातावर ठेवणार .....तर मला धक्काच बसला ...त्याला हात नव्हताच ....हाताच्या जागी घोड्याचं खूर होतं अगदी नाल ठोकलेल ...............................!!


मी तसेच सर्व पैसे  टाकून पळत सुटलो ..आणि आमच्या मुख्य  रस्त्याला लागलो ...समोरून एक घोडागाडी जाताने दिसली .. त्यामध्ये कोणीतरी काळी घोंगडी अंगावर पांघरून ती चालवत होतं..मला ती गाडी बघून धीर आला .. मी पळत पळत जाऊन ती घोडागाडी  पकडली आणि न विचारता घोडा गाडीत चढलो ..तसाच मन खाली घालून पडून राहिलो ...थोडावेळ दोघे हि शांतच ..नंतर तो म्हणाला बाळ ! घाबरलेला दिसतोस ... तर मी म्हणालो हो ..आणि सर्व हकीकत त्याला सांगण्यास सुरवात केली ...कि तो बसलेला भिकारी आणि ....त्याचे हाताचे जागी हात नव्हताच ..घोड्याचा खूर होतं नाळ ठोकलेल....

  त्याने न बोलता सर्व इकून घेतलं.. आणि नंतर शांतपणे म्हणाला ..खूर होतं नाल ठोकलेल .. मी म्हणलो हो ..तर त्याने दाणकन माझी मान पकडून उचलला आणि आपली काळ्या घोंगडी तून हात बाहेर काढून दाखवत विचारलं हे असं......!!  आणि बघतो तर काय ...त्याच्या हाताच्या जागी हात नव्हताच ........हाताच्या जागी घोड्याचं खूर होतं अगदी नाल ठोकलेल ...............................!!


सनी ....एक वेडा मुलगा ...

1 comment:

  1. kay re jivant aahes ajun,,,mhanje bhutane tya divashi asach sodal vatat tula...

    ReplyDelete