Tuesday, February 15, 2011

सुखामागे धावता धावता.....................!!

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही मग माश्याची भागत नाही तहान ...

          स्वप्नं सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
           वाटी -वाटी ने ओतले तरी कमीच पडते तूप ..

बायको आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नका वेळ

            करिअर होतं जीवन मात्र जगायचे जमेना तंत्र
            बापाची ओळख मुलं सांगती पैसा छापायचं यंत्र

चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वतःच्याच घरी ..
दोन दिवस कौतुक होते नंतर डोकेदुखी सारी ..

             मुलंच मग विचारू लागतात बाबा अजून काहो घरी ..?
             त्यांचाही दोष नसतो त्यानाही सवयच नसते मुळी..

क्षणिक औदासिन्य येत मात्र पुन्हा सुरु होतं चक्र ..
करिअर करिअर दळता दळता स्वास्थ्य होतं वक्र ..

             सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या
             आतून मात्र मातीच्या भिंती कधी हि न सारवलेल्या ..

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणू लागतं काही
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही ...

               सगळं काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं
               सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं ...





सनी ....एक वेडा मुलगा .

No comments:

Post a Comment