Monday, February 14, 2011

वाटेच्या वाटसरा ...........!!

आज ऑफिस मधून लवकरच घरी आलो . अपर्णा माझी वाट पहातच बसली होती ..परंतु  तिचे समोर बसलेला दिलीप बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला . दिलीप माझ्या मामांचा मुलगा खूप दिवसापासून  आमचेकडे आला नव्हता .. हाय -हेलो झालेवर मी त्याला येण्याचे कारण विचारले .. तर तो म्हणाला अरे  सुनील ! ती नागपूरची जागा आणि घर विकायचे आहे .. मी निघालोच आहे ..तू  पण येत असेल तर बघ तेवढीच सोबत होईल .म्हणून तुला विचारण्यासाठी आलो आहे ..मी लगेच होकार देऊन टाकला ...अपर्णा ने आश्यर्य चकित होऊन माझे कडे पहिले .. कारण मी एवढे सहज सहजी तयार होईल याची कल्पनाच पण तिने केली नसावी ......पण यामागचे गुपित फक्त मलाच माहित होते .

    दिलीप सकाळी लवकर उठला ..लवकर तयार होऊन आम्ही  कार ने निघालो ..थोडे अंतर गेलेवर दिलीप मला म्हणला तुला झोपायचे असेल तर झोप ..मी नागपूर जवळ आलेवर तुला उठवतो ...मलाही निवांतपणा हवाच होता .मला खूप बरे वाटले मी पण  लगेच हो म्हणालो आणि माझ्या मनाने भूतकाळात केव्हा प्रवेश केला मलाही ही समजले नाही ....

     त्यावेळी फार नाही पण सातवी आठवीला असेल. वडिलांची बदली कलकत्त्याला झाली ..language  चा प्रोब्लेम म्हणून शिक्षणासाठी मामांकडे मला ठेऊन ते गेले . मामा खूप चांगले ...मामी पण आई प्रमाणे प्रेम करीत ...दिलीप आणि मी एकाच वयाचे म्हणून करमायचं पण प्रोब्लेम नव्हता ...सर्व कसे वातावरण एकदम छान होते . शेजारीच निशा राहत होती ...निशा हि शेजारील भाडेकरूची मुलगी ..तिचे आई बाबा काहीतरी छोटा मोठा काहीतरी धंदा करत होते ...त्यांची मिळकत पण जेमतेम  ...म्हणजे जे मिळवत ते  पोटापुरते .... त्यात खाणारी तोंड ४-५ म्हणून कदाचित शिल्लक काहीच राहत नसावे ...

  निशा गोरी नसली तरी दिसायला सुंदर होती , लांबसडक कमरेपर्यंत येणारे केस , सरळ आणि टोकदार नाक , समोरच्याला घायाळ करील असे हास्य , नाजूक बांधा , पाणीदार डोळे , आणि हसताने गालावर पडणारी खळी यामुळे तर ती खूंच सुंदर दिसत होती ... कोणालाही पहिल्यांदाच आवडेल अगदी अशीच  होती . परमेश्वराने  ने सौंदर्याची जणू बरसात च केली होती तिच्यावर ...आणि म्हणूनच काय कोण जाने मी हि बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडलो ....

   निशा कधी - कधी दिलीप कडून गणित सोडून घेण्यास येत असे अशीच एक दिवस आली दिलीप घरात नव्हता ..मामी ने सुनील कडून सोडवून घे असे सांगितले ..आणि मला आवाज  देऊन सांगितले  अरे सुनील ! हिला एवढे गणित सोडवून दे .. मी हो म्हणालो ..गणिताचे  पुस्तक माझेकडे देऊन ती माझे समोर येऊन बसली ..मी गणित समजून सांगताने तिचे लक्ष गणिताकडे नव्हतेच  ती माझे चेहऱ्याकडे च बघत होती .. मी हि पूर्ण विसरून तिच्याकडे पाहत होतो .... डोळ्यात डोळे घालून बघत असतानाच मामीच्या आवाजाने भानावर आलो . " झाले का गणित सोडवून ?? " ती  हो म्हणाली  आणि माझ्या हातातून पुस्तक घेऊन हसत - हसत बाहेर निघून गेली ..कदाचित तीच आमच्या प्रेमप्रकरणाची पहिली सुरवात असावी ....

   आता निशा रोज आमचेकडे गणित सोडवण्यासाठी येऊ लागली... मामी जेवाताने सुनील आलेपासून निशाचे आपलेकडच येणे वाढलंय असा हसत हसत कधीतरी म्हणाल्याचं आठवते .. आम्ही सर्व मित्र -मैत्रिणी  जेवणा नंतर गाण्याच्या भेंड्या पण खेळायचो.. प्रेमाचे गाणे आलेवर .. निशा माझेवर तिरकस कटाक्ष टाकायची ... मला ते अजूनही आठवतं आहे ...आणि खूप छान  असा smile द्यायची ..असेच  दिवसामागून दिवस जात होते ....रविवारी सुट्टीचे दिवशी आम्ही फिरायला हि जायचो ...फिरायला गेलेवर बरोबर नेलेला डब्बा खाता खाता पक्षाने घेतलेली असमान भरारी बघाताने खूप गम्मत वाटे ...

    जेवण झालेवर ...आम्ही कधी कधी कॅरम आणि पत्ते पण खेळायचो ... पत्त्यामधील रम्मी खेळाताने निशा मुद्दाम हून मला पानं सोडतेय आणि मी जिंकतोय असा मला वाटे ...कदाचित पत्त्यामधील गेम जिंकण्यापेक्षा माझं मन  जिंकण तिला महत्वाचा वाटत असावे ...खूप गप्पा पण मारायचो ... पण बाकी सर्व जन लहान म्हणून मी जे काही बोलत होतो ते सर्वात जास्त निशालाच समजत असावे कारण तीच जवळ जवळ माझे एवढी समजदार होती ...निशा खूप अभ्यासू आणि हुशार होती ...

मी आता मोठा झालो होतो ... college ला पण जाऊ लागलो होतो .. निशा माझेकडे येऊन माझे मराठीचे पुस्तक काही समजते का बघते म्हणून घेऊन जाई .. मी पण तिची आवड बघून माझ्या कॉलेज laibrary मधून गोष्टींचे पुस्तके आणून तिला वाचायला देऊ लागलो .. यामुळे कि काय कोण जाने निशा अधिकच माझे जवळ येवू लागली .......!!!



असेच दिवसामागून दिवस जात होते ... निशा आणि माझ्यामध्ये काहीतरी वेगळे नाते निर्माण झाल्याची मला जाणीव होत होती ..निशाबद्दल काही तरी वेगळे आकर्षण वाटू लागले होते ...आता निशा आणि मी तासंतास गप्पा मारत बसू लागलो  .. मी माझ्या कॉलेज मधील गमतीजमती तिला सांगत असे आणि ती पण शाळेतील आणि घरातील सुद्धा माझेबरोबर share करत असे.. किती छान दिवस होते ते ....हे दिवस संपूच नये आसे मला वाटे ..

  निशाला आपल्या प्रेमाबद्दल सांगावेसे खूप वेळेस वाटले पण धीर झाला नाही ..एक मन म्हणे अरे सांगून टाक..तीही तुझ्यावर तेवढेच प्रेम करत असेल तर .. जेवढा तू करतोस ..पण एक मन म्हणे नको ..जर ती तुला चांगला मित्र मानत असेल आणि म्हणून सर्व तुझेबरोबर share करत असेल तर ?केवढा धक्का बसेल तिला .आणि तिच्या बालमनावर किती ताण येईल याचा विचार केला आहेस तू ? म्हणून मी तिला केव्हाच म्हणालो नाही ...

  असेच एकदम आनंदात दिवस चालले होते ...पण म्हणतात ना नियतीला सर्वच गोष्टी मान्य नसतात ..ती कधीतरी आपला रंग दाखवतेच  अगदी तसेच झाले शेवटी नियतीने आपला रंग दाखवलाच ...मामाकडे बाबांचा फोन आला त्यांची बदली परत पुण्याला झाली ..आणि ते आठ दिवसात मला नेण्यासाठी येणार होते . आता या सर्व मुलाना आणि त्यातल्या त्यात निशाला सोडून जाणे ह्या नुसत्या विचारानेच माझे डोकं फिरू लागले होते . काय करावे सुचत नव्हते .रोज समोर हसणारी , खेळणारी निशा आठ दिवसानंतर माझे समोर नसणार होती ...नुसत विचार केला तरी अंगावर काटा  उभा राहत होता ...शेवटी बाबा आलेच ...

 माझे जाण्याचे आधल्या दिवशी आम्ही सर्व मित्र एकत्र जमलो ...सर्वजन आले होते.. पण अजून निशा आली नव्हती ..सर्व मुला-मुली  मला मी परत कधी येणार , तिकडे काय करणार , आम्हाला विसरणार तर नाही ना? असा विचारात होती .माझा लक्ष त्यांचेकडे नव्हतेच मी निशाची वाट पहात होतो ...शेवटी निशाही आली येऊन माझे शेजारीच ती बसली ..निशा आज शांत -शांतच वाटत होती ... तिचा चेहराही पडला होता ..काहीच बोलत नव्हती ..थोडावेळ बसून .आई बोलावतेय ..येते रे सुनील ! असा म्हणून गेली सुद्धा ..पण जाताने तिच्या डोळ्यात पाणी आले ..ओघळ थेट गालापर्यंत आला .पण तिने क्षणार्धात तो डाव्या हाताने पुसून टाकला ....कदाचित तो माझा भास हि असेल ..

  ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्यादिवशी वडिलांबरोबर पुण्याला निघून गेलो ....आणि ज्यावेळी आपल्या घरात आपल्या लग्नाचा विषय निघेल त्यावेळेस निशा चं नाव सुचवायचा असा मनाशी पक्का निर्धार केला ..आणि पुण्यात माझं daily Routine सुरु केलं .. असाच मध्यंतरी दिलीपचं एक पत्र आला त्यात त्याने  "निशाच लग्न झाले "अस लिहिले .....जशी काच जमिनीवर पडून तिला असंख्य तडे जावेत असे तडे माझ्या एकतर्फी प्रेमाला गेले ..खूप वायीट वाटले ..त्यादिवशी रात्रभर रडत होतो ..शेवटी झाले गेले विसरून बाबांनी सुचवलेल्या मुलीशी लग्न केले .... आणि आज एवढ्या दिवसानंतर दिलीप ने पुन्हा नागपूरला जाण्याचा विषय काढला आणि म्हणूनच मी होकार हि  देऊन टाकला ....एवढ्यात नागपूर हि आले .. दिलीप चा आवाज आला झाली कारे झोप ?...मी हो म्हणालो .....

 काल प्रवासामुळे थकल्यावर लगेच झोपलो ..सकाळी दिलीप ने लवकर आवरून मला उठवले ..मी हि दहाच मिनिटात तयार झालो . दिलीप म्हणाला मी  वकीलाबरोबर जाऊन येतो तू आलास तरी हरकत नाही पण उगीच बोअर होशील म्हणून ..पाहिजे तर निशाकडे जाऊन ये ..शेजारीच मारुतीच्या मंदिरासमोरच एक किराणामालाच छोटासा दुकान आहे त्याचे मागील बाजूसच राहते ती ..मला हि तेच हवं होतं. दिलीप ने दिलेलेल्या पत्त्यावर घर लगेचच सापडलं..........

     मला समोर बघतच निशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य असे संमिश्र भाव तरळले . अरे सुनील ! इकडे कुठे आलास  ? मला आतमध्ये घरात बोलावून आणि मला बसायला टाकून ती आत मध्ये निघून गेली . माझ्याहातावर चहा ठेऊन आलेच हं !असा म्हणून मुलींचे शाळेत जानेसाठी वेण्या- फनी  करण्यासाठी गेली ..... मध्यंतरी वेळ काढून चहा घेण्यासाठी तिचा नवरा हि दुकानातून येऊन गेला..तिने त्याचेशी माझी ओळख करून दिली ..निशाला एवढा कृश नवरा हि कल्पनाच मला सहन होत नव्हती . सलग तीन मुली झालाय म्हणून सतत तिच्यावर रागावणारी तिची सासू ...माझी व हिची काय ओळख या अविर्भावात इकडून तिकडे करत होती ....

    शेवटी मुलीना शाळेत पाठवून , सासूस पुजेची तयारी करून देऊन ती माझेसमोर येऊन बसली ..सुरवातीला दोघेही शांत ...टाचणी पडावी तरी आवाज व्हावा अशी शांतता..  शेवटी मीच तिला म्हणालो सध्या काय करतेस काही वाचतेस कि नाही ...तर म्हणाली वाचते वेळ मिळाला , पुस्तक मिळाला तर कधी कधी ...पण पूर्वी वाचलेला सर्व लक्षात आहे माझ्या ..आणि काही तरी आठवल्यासारखा एकदम जोरात म्हणाली ...सुनील , तुला ती कविता आठवते का रे ..." वाटेच्या वाटसरा ...........
.........जाई दुजा गावा ....पुढच्या जन्मी तुझा हिशोब करीन ! .........या जन्मी  मी पराधीन .....!."

    पूर्वी ती शाळेत असताने मीच कोणीतरी एका मोठ्या लेखिकेने लिहिलेल्या या कवितेचे रसग्रहण तिला केले होते ... " एक प्रियसी , आपले जुन्या प्रियकराला हात जोडून विनवते ....हे प्रियेकरा ! जुन्या आठवणी तश्याच झोपलेल्या राहू देत त्यांना जाग्या करू नकोस ..!  ' आठवणींचा नाग डंख करेल त्याला फना वर काढू देऊ नकोस !'  असा अर्ध्यावर येऊन माझ्या फुललेल्या , बहरलेल्या संसारात विष कालवू  नकोस ....तू आल्या पावली परत निघून जा ......या जन्मी मी दुसऱ्याची आहे ..पण हे प्रियकरा ! मी तुला वचन देते पुढच्या जन्मी मी  नक्कीच तुझी होईल..............."

  आज तिने या कवितेची तिने आठवण करून दिली आणि इतक्या दिवस मनात असलेल्या कुतुहलाचे ..प्रश्नाचे मला उत्तर मिळाले ....आणि मी लगेच तिचा निरोप घेतला ...तो परत कधीही न भेटण्यासाठीच



सनी ..एक वेडा मुलगा 

No comments:

Post a Comment